शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

प्रेमप्रकरण ठरतेय खुनाचे तिसरे सर्वांत मोठे कारण! महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 06:51 IST

लैंगिक छळ किंवा वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी महाराष्ट्रातून ७८४ महिलांची तस्करी करण्यात आली

नवी दिल्ली : देशात महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये २०२२ मध्ये १२.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, सर्वाधिक छळ हा कुटुंबातील व्यक्तींकडूनच होत आहे. भारतात प्रत्येक तासाला तीन खून होतात, यातील एक खून हा प्रेमप्रकरणातून होत असल्याचे केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर आले आहे. मानवी तस्करीचे प्रमाणही २०२२ मध्ये वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढलीदेशभरात ६,०३६ मानवी तस्करीच्या घटना घडल्या असून, यात ३,५९४ महिलांचा समावेश आहे. तर २,४४२ पुरुषांचा समावेश आहे. मानवी तस्करी केलेल्यांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून १८ वर्षांवरील देशातून सर्वाधिक ७४४ महिलांची तस्करी करण्यात आली आहे. तर बिहारमधून १८ वर्षांखालील मुलांची बालकामगार म्हणून वापर करण्यासाठी सर्वाधिक तस्करी करण्यात आली आहे

वेश्याव्यवसायासाठी तस्करी कुठून? लैंगिक छळ किंवा वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी महाराष्ट्रातून ७८४ महिलांची तस्करी करण्यात आली. यानंतर तेलंगणातून ६४६ महिलांची, बिहारमधून १२६ तर आंध्र प्रदेशमधून २६० महिलांची तस्करी करण्यात आली.  चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी कर्नाटकातून ४७ जणांची तस्करी करण्यात आली.

राज्यातील पाच हजार मुले गायबदेशभरात १८ वर्षांखालील एक लाख २७ हजार ८७४ मुले गायब असून, महाराष्ट्रात एकूण पाच हजार ३९३ मुले गायब आहेत. त्यातील २,८०६ मुली आहेत. २०२२ मध्ये महाराष्ट्रातील तीन हजार ६९ मुले गायब आहेत. पश्चिम बंगालमधून सर्वाधिक १९ हजार ५४० मुले बेपत्ता आहेत.

एनसीआरबी अहवालात माहिती

  • ५८.५% बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले.
  • ५१.१% बेपत्ता झालेल्या नागरिकांना शोधण्यात देशभरात यश आले. बेपत्ता झालेल्या ४९% नागरिकांचा शोध घेण्यात पोलिसांना अपशय आले आहे. 
  • ८७.१% बेपत्ता नागरिकांना शोधण्यात केरळ पोलिसांना यश आले. त्यानंतर तेलंगणा (८६.४%), आसाम (७२.३%) या राज्यांचा क्रमांक लागतो.
  • १८.१% बेपत्ता नागरिकांना शोधण्यात ओडिशा पोलिसांना यश आले. हे देशातील सर्वाधिक कमी प्रमाण आहे.
  • ६१.८%  बेपत्ता महिलांचा शोध महाराष्ट्रात घेण्यात आला आहे.
टॅग्स :Missingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी