प्रेमप्रकरण ठरतेय खुनाचे तिसरे सर्वांत मोठे कारण! महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 06:51 AM2023-12-06T06:51:24+5:302023-12-06T06:51:56+5:30

लैंगिक छळ किंवा वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी महाराष्ट्रातून ७८४ महिलांची तस्करी करण्यात आली

Love affair is the third biggest cause of murder! Trafficking of women increased from Maharashtra | प्रेमप्रकरण ठरतेय खुनाचे तिसरे सर्वांत मोठे कारण! महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढली

प्रेमप्रकरण ठरतेय खुनाचे तिसरे सर्वांत मोठे कारण! महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढली

नवी दिल्ली : देशात महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये २०२२ मध्ये १२.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, सर्वाधिक छळ हा कुटुंबातील व्यक्तींकडूनच होत आहे. भारतात प्रत्येक तासाला तीन खून होतात, यातील एक खून हा प्रेमप्रकरणातून होत असल्याचे केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर आले आहे. मानवी तस्करीचे प्रमाणही २०२२ मध्ये वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

महाराष्ट्रातून महिलांची तस्करी वाढली
देशभरात ६,०३६ मानवी तस्करीच्या घटना घडल्या असून, यात ३,५९४ महिलांचा समावेश आहे. तर २,४४२ पुरुषांचा समावेश आहे. मानवी तस्करी केलेल्यांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून १८ वर्षांवरील देशातून सर्वाधिक ७४४ महिलांची तस्करी करण्यात आली आहे. तर बिहारमधून १८ वर्षांखालील मुलांची बालकामगार म्हणून वापर करण्यासाठी सर्वाधिक तस्करी करण्यात आली आहे

वेश्याव्यवसायासाठी तस्करी कुठून? 
लैंगिक छळ किंवा वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी महाराष्ट्रातून ७८४ महिलांची तस्करी करण्यात आली. यानंतर तेलंगणातून ६४६ महिलांची, बिहारमधून १२६ तर आंध्र प्रदेशमधून २६० महिलांची तस्करी करण्यात आली.  चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी कर्नाटकातून ४७ जणांची तस्करी करण्यात आली.

राज्यातील पाच हजार मुले गायब
देशभरात १८ वर्षांखालील एक लाख २७ हजार ८७४ मुले गायब असून, महाराष्ट्रात एकूण पाच हजार ३९३ मुले गायब आहेत. त्यातील २,८०६ मुली आहेत. २०२२ मध्ये महाराष्ट्रातील तीन हजार ६९ मुले गायब आहेत. पश्चिम बंगालमधून सर्वाधिक १९ हजार ५४० मुले बेपत्ता आहेत.

एनसीआरबी अहवालात माहिती

  • ५८.५% बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले.
  • ५१.१% बेपत्ता झालेल्या नागरिकांना शोधण्यात देशभरात यश आले. बेपत्ता झालेल्या ४९% नागरिकांचा शोध घेण्यात पोलिसांना अपशय आले आहे. 
  • ८७.१% बेपत्ता नागरिकांना शोधण्यात केरळ पोलिसांना यश आले. त्यानंतर तेलंगणा (८६.४%), आसाम (७२.३%) या राज्यांचा क्रमांक लागतो.
  • १८.१% बेपत्ता नागरिकांना शोधण्यात ओडिशा पोलिसांना यश आले. हे देशातील सर्वाधिक कमी प्रमाण आहे.
  • ६१.८%  बेपत्ता महिलांचा शोध महाराष्ट्रात घेण्यात आला आहे.

Web Title: Love affair is the third biggest cause of murder! Trafficking of women increased from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.