शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

पासपोर्टवर लवकरच दिसणार कमळाचं चिन्ह; परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 23:12 IST

संसदेत मोठा गदारोळ झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: भारतीय पासपोर्टवरील कमळाच्या चिन्ह्याचा मुद्दा संसदेत गाजला. विरोधकांनी यावरुन मोदी सरकारला धारेवर धरलं. यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दल स्पष्टीकरण दिलं. सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. कालांतरानं देशाच्या इतर प्रतिकांचाही पासपोर्टवर वापर करण्यात येईल, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. केरळमधील कोझिकोडमध्ये काही जणांना कमळाचं चिन्ह असलेली पासपोर्ट्स मिळाल्याचा मुद्दा काँग्रेस खासदार एम. के. राघवन यांनी लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. एका वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त दिल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं. सरकारी संस्थांचं भगवाकरण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभेत पासपोर्टचा मुद्दा गाजल्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार पत्रकार परिषदेत याबद्दल स्पष्टीकरण दिलं. कमळ आपलं राष्ट्रीय फूल आहे. पासपोर्टवर कमळाचं चिन्ह लावल्यामुळे बोगस पासपोर्ट लगेच ओळखता येतील. कमळाच्या फुलाचं चिन्ह पासपोर्टच्या सुरक्षेसाठी वापरलं जाईल, असं कुमार यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या (आयसीएओ) सूचनांवरुन पासपोर्ट आणखी सुरक्षित करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून कमळाचं चिन्ह वापरण्यात येत असल्याचंदेखील कुमार म्हणाले. कमळासोबतच देशाच्या अन्य प्रतिकांचादेखील टप्प्याटप्प्यानं वापर केला जाईल. सध्या पासपोर्टवर कमळाचं चिन्ह आहे. पुढील महिन्यात एखादं दुसरं चिन्ह असेल. भारताशी संबंधित प्रतिकांचा वापर पासपोर्टवर केला जाईल, असं रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं.   

टॅग्स :passportपासपोर्टNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस