शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येत ‘कमळ’काल! ५ राज्यांतील पोटनिवडणुकीत काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 06:20 IST

अरुणाचल, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती.

नवी दिल्ली : पूर्वोत्तर भारतातील त्रिपुरा आणि नागालँडच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपने बाजी मारली, तर  मेघालयात मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आकडेवारीनुसार सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु बहुमताचा आकडा गाठण्यात अपयशी ठरला. त्यामुळे संगमा यांनी अमित शाह यांना फोन करून पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत राहणार आहे.

त्रिपुरात दुसऱ्यांदा सत्तात्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजप-आयपीएफटी युतीने ६० पैकी ३३ जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. भाजपला ३२ तर इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराला एक जागा मिळाली. नागालँडमध्येही बहुमतनागालँडमध्ये सत्ताधारी एऩ़़डीपीपी-भाजप युतीने ६० सदस्यांच्या विधानसभेत ३७ जागा जिंकून बहुमत मिळवले. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने (एनडीपीपी) २५ जागा जिंकल्या, तर त्यांच्या सहयोगी भाजपला १२ जागा मिळाल्या.   

मेघालयमध्ये भाजप किंगमेकरमेघालयात संगमा यांचा पक्ष २६ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. तरी बहुमताचा ३१ चा आकडा काही गाठता आला नाही. संगमा यांनी  पाठिंब्यासाठी अमित शाह यांना फोन केल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. संगमा यांनी आधीच निवडणुकीपूर्वी तुटलेली भाजपसोबतची त्यांची युती पुन्हा होऊ शकते, असे संकेत दिले होते. 

५ राज्यांतील पोटनिवडणुकीत काय झाले?

अरुणाचलमध्ये भाजपचे जांबे ताशी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लुमला जागेवर भाजपच्या त्सेरिंग ल्हामू बिनविरोध निवडून आल्या.पाच राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल गुरुवारी लागले. अरुणाचल, झारखंड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती, तर महाराष्ट्रात दोन जागा होत्या. एकूण सहा जागांपैकी तीनवर काँग्रेसने विजय मिळविला.

नागालँडमध्ये पहिल्यांदाच महिला आमदार१९६३ मध्ये नागालँड राज्य झाल्यापासून पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आल्या आहेत. एनडीपीपीच्या ४७ वर्षीय हेकानी जाखालू या दिमापूर येथून विजयी झाल्या. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस