स्वत:च्या वरातीत नाचताना नवरदेवाचा मृत्यू
By Admin | Updated: May 13, 2017 00:02 IST2017-05-13T00:02:57+5:302017-05-13T00:02:57+5:30
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंददायी क्षण असतो. नवे स्वप्न घेऊन नवे आयुष्य येथून सुरू होते. अहमदाबादमधील

स्वत:च्या वरातीत नाचताना नवरदेवाचा मृत्यू
अहमदाबाद : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंददायी क्षण असतो. नवे स्वप्न घेऊन नवे आयुष्य येथून सुरू होते. अहमदाबादमधील या नवरदेवासाठीही हा क्षण तितकाच आनंदाचा होता; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. जो दिवस अविस्मरणीय म्हणून गणला जावा तोच दिवस जर शेवटचा ठरत असेल तर नियतीच्या या क्रूरपणाला म्हणावे तरी काय?
त्याचे झाले असे की, सागर सोळंकी या तरुणाचा विवाह काही वेळातच संपन्न होणार होता. वरात निघाली. मित्रमंडळी या वरातीत नाचू लागली.
मित्रांनी या नवरदेवाला आपल्या खांद्यावर घेतले आणि ते नाचू लागले; पण अचानक नवरदेवाला चक्कर आली आणि यातच नवरदेवाचा मृत्यू झाला. या वरातीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. असे सांगण्यात येत आहे की, त्याला हृदयविकाराचा झटका आला. नवं आयुष्य सुरू करण्यास निघालेल्या तरुणाचा झालेला मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. (वृत्तसंस्था)