लेनिन,आंबेडकर,मुखर्जी...आणि आता हनुमानाच्या मूर्तीची विटंबना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 16:41 IST2018-03-08T16:16:43+5:302018-03-08T16:41:11+5:30

महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचं सत्र सुरू असताना आता समाजकंटकांनी  देवाच्या मूर्त्यांनाही लक्ष्य केल्याचं दिसतं. कारण आता हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्याचं समोर आलंय. 

Lord Hanuman’s statue desecrated in UP’s Ballia | लेनिन,आंबेडकर,मुखर्जी...आणि आता हनुमानाच्या मूर्तीची विटंबना

लेनिन,आंबेडकर,मुखर्जी...आणि आता हनुमानाच्या मूर्तीची विटंबना

बलिया : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचं सत्र सुरू असताना आता समाजकंटकांनी  देवाच्या मूर्त्यांनाही लक्ष्य केल्याचं दिसतं. कारण आता हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्याचं समोर आलंय. 

भाजपाने त्रिपुरामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर लेनिन यांच्या पुतळ्यांची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यानंतर देशाच्या विविध भागांत विविध विचारधारांच्या नेत्यांचे पुतळे लक्ष्य होऊ लागले. तामिळनाडूमध्ये पेरियार, कोलकात्यात श्यामा प्रसाद मुखर्जी, उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केरळमध्ये महात्मा गांधी आणि आता हनुमानाच्या मुर्तीची विटंबना केल्याचं समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. येथील खरूआव गावात बुधवारी काही समाजकंटकांनी भगवान हनुमानाच्या पुतळ्याची विटंबना केली. तेथे एक पोस्टर देखील लावण्यात आलं होतं. या गावाचे प्रमुख दुष्यंत सिंह यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे.  
 

Web Title: Lord Hanuman’s statue desecrated in UP’s Ballia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.