शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

रुग्णालये बनली लुटीची ठिकाणे! सुप्रीम कोर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 06:48 IST

बहुतेक रुग्णालये व्यावसायिक लूट करीत आहेत, बिलासाठी मृतदेह अडकवून ठेवणे हे वैद्यकीय नियम व लोकांच्या अधिकारांच्या विरोधात आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी गरजूंना मोफत सेवा द्यावी, हे दिल्ली सरकारचे परिपत्रकही वैध ठरवले आहे.

नवी दिल्ली : बहुतेक रुग्णालये व्यावसायिक लूट करीत आहेत, बिलासाठी मृतदेह अडकवून ठेवणे हे वैद्यकीय नियम वलोकांच्या अधिकारांच्या विरोधात आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी गरजूंना मोफत सेवा द्यावी, हे दिल्ली सरकारचे परिपत्रकही वैध ठरवले आहे. हा आदेश दिल्लीपुरता असला तरी तोसर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्याची अंमलबजावणी अन्य राज्यांत शक्य आहे. सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी१० टक्के इनडोअर व २५ टक्के आऊटडोअर पेशंटना मोफत उपचार देण्याचे आदेश त्यात आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींवर खरमरीत टिप्पणी यात आहे.मृतदेह अडकवून ठेवणाऱ्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवावेत. तसेच डॉक्टर बनविण्यासाठीसरकार मोठ्या प्रमाणात सार्वजनिक रक्कम खर्च करते. त्यामुळे डॉक्टरांनीही पैशांचा विचार न करता गरजूंना उपचार द्यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.निष्कारण तपासण्या नकोत अनावश्यक तपासण्या करणाºया डॉक्टरानीही आत्मपरीक्षण करावे. वैद्यकीय क्षेत्रास लागलेली कीड घालवण्याची वेळ आली आहे. हे क्षेत्र व्यावसायिक पिळवणुकीसाठी कधीच नाही. डॉक्टर रुग्णासाठी देव असतात, त्यांनी तसाच व्यवहार ठेवावा, असेही न्यायलयाने सुनावले आहे.काय होते प्रकरण?दिल्लीच्या जमीन आणि विकास अधिकाºयांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या २००७ सालाच्या निर्णयाचा हवाला देऊन सवलतीच्या दरात जमीन घेतलेल्या रुग्णालयांनी गरजू रुग्णांवर मोफत औषधोपचार करावेत, असे आदेश २ फेब्रुवारी २०१२ रोजी दिले होते. या आदेशाला काही धर्मादाय रुग्णालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने तेपरिपत्रक रद्द ठरविले. उच्च न्यायालयाच्या या आदेशास केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करून आव्हान दिले होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय