नववर्षाचे स्वागत हिलस्टेशनवर जाऊन करणार आहात? दिल्लीत थंडीची लाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 09:45 IST2019-12-27T09:45:17+5:302019-12-27T09:45:44+5:30
सरत्या वर्षाला निरोप देताना देशभरात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1907 मध्ये दिवसाचे सरासरी तापमान 17.3 अंश सेल्सिअस होते.

नववर्षाचे स्वागत हिलस्टेशनवर जाऊन करणार आहात? दिल्लीत थंडीची लाट
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये जोरदार थंडी पडली आहे. यंदाची थंडी दिल्लीतील ऐतिहासिक थंडी ठरणार आहे. कारण हा डिसेंबर गेल्या 118 वर्षांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा कमी तापमानाचा राहणार आहे. 1901 ते 2018 पर्यंत कोवळ चारवेळाच डिसेंबरमधील सरासरी तापमान 20 डिग्रीपेक्षा खाली गेले आहे. यंदाचा हा महिना 19.85 एवढा सरासरी कमी तापमानाचा गेला असून 31 डिसेंबरपर्यंत हाच आकडा 19.15 डिग्रींवर घसरण्याची शक्यता आहे.
सरत्या वर्षाला निरोप देताना देशभरात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1907 मध्ये दिवसाचे सरासरी तापमान 17.3 अंश सेल्सिअस होते. नववर्षाचे स्वागत करताना काहीसा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 1 आणि 2 जानेवारीला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागानुसार 3 जानेवारीपर्यंत थंड हवेच्या ठिकाणांवर जोरदार पाऊस होणार आहे. राजस्थानच्या फतेहपूरमध्ये रात्रीचे तापमान 0 ते 3 अंशावर तर सीकरमध्ये उणे होत आहे.
पश्चिमी दिशेकडून हवेचा जोर असल्याने दिल्लीच्या आकाशात ढग दाटलेले आहेत. ज्यामुळे सूर्याचे उन खाली येत नाहीय. यामुळे दिवसाचेही तापमान वाढत नाहीय. यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत सुधारणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास 1901 नंतर दुसरा डिसेंबर थंडीचा असणार आहे. 18 डिसेंबरला दिल्लीतील तापमान 12 अंशावर जाऊन पोहोचले होते. हे गेल्या 22 वर्षांतील सर्वाधिक कमाल तापमान होते.