लोणी खुर्द कार्यकारी सेवा संस्था
By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30
लोणी : लोणी खुर्दच्या विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संजय सोपानराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लोणी खुर्द कार्यकारी सेवा संस्था
ल णी : लोणी खुर्दच्या विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संजय सोपानराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष बापूसाहेब आहेर यांची राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर संजय आहेर यांना संधी देण्यात आली. यावेळी के.पी. आहेर, शांतीनाथ आहेर, बाळासाहेब आहेर, कारभारी आहेर, भानुदास घोगरे आदींसह संचालक उपस्थित होते.नूतन अध्यक्षांचे पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, युवा नेते डॉ.सुजय विखे आदिंनी अभिनंदन केले आहे.