शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:24 IST

Ahmedabad Plane Crash : अभिनव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विवान वारंवार त्याच्या वडिलांना भेटायचं असल्याचं म्हणत आहे.

विमान अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अभिनव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विवान वारंवार त्याच्या वडिलांना भेटायचं असल्याचं म्हणत आहे. विवान शुक्रवारी रात्री त्याच्या आईसह लंडनहून भारतात आला. जेव्हा तो लंडनहून निघाला तेव्हा तो भारतात त्याच्या वडिलांना भेटणार असा विचार करून  खूप आनंदी झाला होता. पण आठ वर्षांच्या विवानला माहित नाही की त्याचे वडील आता या जगात नाहीत. अभिनव यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची पत्नी शुक्रवारी संध्याकाळी मुलाला घेऊन अहमदाबादला आली.

अभिनव यांचे नातेवाईक आशिष यांनी टीव्ही 9 भारतवर्षशी संवाद साधला आणि सांगितले की, विमान अपघाताची बातमी ऐकताच ते बिकानेरहून आले. त्यांनी  डीएनए सँपल दिले आहेत. प्रशासनाने ७२ तासांचा वेळ दिला आहे. डीएनए प्रोफाइल जुळल्यानंतरच मृतदेह दिला जाईल. अभिनव यांचा आठ वर्षांचा मुलगा सतत वडिलांची आठवण काढत आहे. तो सतत मला बाबांशी बोलायचं आहे असं म्हणत आहे. 

आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

अभिनव यांचं कुटुंब राजस्थानहून अहमदाबादला आलं आणि नंतर अभिनव कामासाठी लंडनला गेले. ते एक्सपोर्ट इम्पोर्टचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणार होते. याच दरम्यान, त्यांच्या आजोबांचं निधन झालं. अभिनव यांचं आजोबांवर खूप प्रेम होतं म्हणून ते भारतात आले होते. त्यानंतर ते लंडनला जायला निघाले. विमानतळावर त्यांच्या आईला फोन केला आणि लंडनला पोहोचताच ते पुन्हा फोन करतील असं सांगितलं. पण याच दरम्यान त्यांना मृत्यूने गाठलं आहे. 

कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ

"माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच एअर इंडियाचं विमान कोसळलं. बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरमध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विश्वकुमार रमेश हा एक प्रवासी या अपघातातून वाचला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात अहमदाबादच्या ज्या निवासी भागात विमान कोसळलं त्या भागात राहणाऱ्या चार वैद्यकीय विद्यार्थ्यांसह किमान आठ स्थानिक लोकांचाही मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया