लोणारच्या ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाला प्रथम पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर गौरव :

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30

लोणारच्या ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाला केंद्राचा पुरस्कार

Lonar's Green Housing Project has won the first prize at the national level: | लोणारच्या ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाला प्रथम पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर गौरव :

लोणारच्या ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाला प्रथम पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर गौरव :

णारच्या ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाला केंद्राचा पुरस्कार
मयुर गोलेच्छा/लोणार (जि. बुलडाणा) : केंद्र सरकार, राज्य सरकार व नगर पालिकेच्यावतीने येथे सुरू असलेल्या ६०० घरकुलांच्या महत्वाकांक्षी ग्रीन हाऊसिंग प्रकल्पालाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. नवीन व ऊर्जा मंत्रालयाचे मुख्य सचिव भूपेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते शुक्रवारी लोणार नगरपरिषदेला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील खार्‍या पाण्याच्या सरोवर परिसरात वाढत्या मानवी हस्तक्षेपाला पायबंद घालण्याकरीता सरोवर काठावरील अतिक्रमीतधारकांसाठी शहरापासून १ किमी अंतरावर केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडप˜ी विकास योजनेंंतर्गत पर्यावरणपूरक ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाचे काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या नविन व नविनीकरण उर्जा मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार घरांच्या बांधकामात शाश्वत साहित्याचा वापर केला जात आहे. यामुळे हा प्रकल्प देशात महत्वपूर्ण ठरला असून नवीन आणि नविनीकरण उर्जा मंत्रालयाच्या शाश्वत अधिवास विकास आणि संशोधन संस्था, एकात्मीक आवास ग्रीन रेटींगकडून लोणार नगर परिषदेला हा पुरस्कार मिळाला़ या मंत्रालयाचे मुख्य सचिव भुपेंद्र त्रिपाठी यांच्याहस्ते नगराध्यक्षा रंजना राजेश मापारी, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, न. प. चे कनिष्ठ अभियंता अजय हाडोळे, तांत्रिक सल्लागार मनिष भुतडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Web Title: Lonar's Green Housing Project has won the first prize at the national level:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.