शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची आहे,सुरूवात अकोल्यातून; मोदी सरकारवर यशवंत सिन्हा पुन्हा कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 1:53 PM

सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात मात्र, आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नाही त्यासाठी जीडीपी हे खरे स्वरूप महत्वाचं आहे.

अकोला - देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन आपल्या लेखातून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. माझ्या लेखानंतर आलेल्या प्रतिक्रिया या देशात काही तरी चुकत आहे या स्पष्ट करणाऱ्या आहेत. आता राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची गरज आहे आणि त्याची सुरूवात अकोल्यातून करत आहोत असं ते म्हणाले. अकोल्यात शेतकरी जागर मंचाच्या वतीने यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.  ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटी व शेतकरी’, या विषयावर त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला.  यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या नोटबंदीपासून ते जीएसटीपर्यंत विविध मुद्यांवर टीका केली. नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नवीन रोजगार थांबलाय, कर्मचारी कमी केले जात आहेत आणि आम्ही आमच्याच लोकांना भुलवत ठेवत सरकार चालवत आहोत. सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात मात्र, आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नाही त्यासाठी जीडीपी हे खरे स्वरूप महत्वाचं आहे. जीएसटीमध्ये दिलेल्या सवलती दिशाभूल करणाऱ्या आहेत, मी सरकारला आवाहन करतो या विसंगती दूर करा अन्यथा देशाच्या अर्थ व्यवस्थेला मोठा धोका निर्माण होईल असं ते म्हणाले. जीएसटी म्हणजे गुड अॅंन्ड सिम्पल टॅक्स नाही तर आता एवढा जटील केला आहे की बॅड अॅन्ड काँप्लिकेटेड टॅक्स झाला आहे अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली. यशवंत सिन्हा हे  माजी केंद्रीय अर्थमंत्री असल्याने त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेतले जात आहे. 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारGSTजीएसटीNote BanनोटाबंदीFarmerशेतकरी