शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सेमीफायनलनंतर आता थेट फायनल! ताज्या सर्वेक्षणात भाजप की काँग्रेस? कुणाचं बनणार सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 00:09 IST

Loksabha Election Survey: दक्षिण भारतात कुणाला किती जागा?

देशात नुकत्याच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यांपैकी तीन राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला. यानंतर आता भाजपचे लक्ष लागले आहे, ते पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निडवणुकीकडे. झालेल्या या विधानसभा निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून बघितले जात होते. अशा स्थितीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, यासंदर्भात लोकांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. यातच आता सार्वत्रिक निवडणुकांबाबतचे सर्वेक्षणही समोर येऊ लागले आहे. ताज्या सर्वेक्षणात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील I.N.D.I.A. ला मोठा धक्का बसेल असे चित्र आहे. तर भाजप सलग तिसऱ्यांदा स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.

'टाइम्स नाऊ आणि ईटीजी'च्या ताज्या सर्वेक्षणात एनडीएला 319 ते 339 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर I.N.D.I.A. ला 148-168 जागा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, आता निवडणुका झाल्यास भाजपला 308-328 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 52-72 जागा मिळू शकतात. याशिवाय वायएसआरसीपी 24-25, डीएमके 20-24, टीएमसी 20-24, बीजेडी 13-15, बीआरएस 3-5 आणि इतरांच्या खात्यात 60-76 जागा जाऊ शकतात, असेहीया सर्वेक्षणात म्हण्यात आले आहे.

कुठल्या राज्यात किती जागा? -सर्वेक्षणानुसार यूपीमध्ये एनडीएला 70-74 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर I.N.D.I.A. ला 4-8 जागा आणि इतरांना 0-4 जागा मिळू शकतात. दिल्लीमध्ये एनडीएच्या खात्यात सहा ते सात जागा जाऊ शकतात, तर आम आदमी पक्षाला शून्य ते एक जागा मिळू शकते. छत्तीसगडमध्ये एनडीए 10-11 जागा जिंकू शकते आणि I.N.D.I.A. ला 0-1 जागा मिळू शकते. मध्य प्रदेशातील एकूण 29 जागांचा विचार करता, एनडीए 27-29 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर I.N.D.I.A. ला 0-1 जागा मिळू शखते. तसेच गुजरातच्या सर्वच्या सर्व 26 जागा भाजपच्या पारड्यात जाऊ शकतात.

दक्षिण भारतात कुणाला किती जागा? -आंध्र प्रदेशात वायएसआरसीपीला 25 पैकी 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. केरळमध्ये I.N.D.I.A. ला 18-20 जागा मिळू शकतात. तेलंगणामध्ये काँग्रेसला 8-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये I.N.D.I.A. ला 39 पैकी 30-36 जागा मिळू शकतात. एनडीएला येथे मोठा धक्का बसू शकतो आणि केवळ शून्य ते एक जागा मिळू शकते, तर एआयएडीएमकेला 3-6 जागा मिळू शकतात.

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे