शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:31 IST

Viral Video : मध्य प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरात  ९३ जागांवर मतदान पार पडलं. देशात ९३ मतदारसंघांत एकूण १,३५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा महत्त्वाच्या ठिकाणी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून काळजी घेण्यात येत आहे. मात्र आयोगाच्या सतर्कतेनंतरही अनेक ठिकाणी मतदानाच्या वेळी गैरप्रकार घडत असल्याचे समोर आलं आहे. अनेक मतदारांनी मतदानावेळी आपलं मत टाकताना त्याचे व्हिडीओ मोबाईलवर शूट केल्याचं समोर आलं आहे. आता सगळ्याची हद्द म्हणजे मध्य प्रदेशाता भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलाने मतदान केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्याचा हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर हे त्यांच्या अल्पवयीन मुलासह मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी विनय मेहर यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान करण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मेहेर यांनी याचे व्हिडीओ शूटिंग करुन तो फेसबुकवर देखील पोस्ट केला. मात्र हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर व्हिडिओ डिलीटही करण्यात आला. मात्र याप्रकरणी आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडेही या प्रकरणाची तक्रार पोहोचली आहे.

काँग्रेसने या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपसह निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते पीयूष बबेले यांनी हा व्हिडीओ एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. "भाजपने निवडणूक आयोगाला मुलांचे खेळणे बनवले आहे. भोपाळमध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान करायला लावले. विनय मेहर यांनी मतदान करताना एक व्हिडिओही बनवला आहे. विनय मेहरने हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. काही कारवाई होईल का?," असा सवाल काँग्रेस नेत्याने विचारला आहे.

मुलाच्या हट्टामुळे मतदान केंद्रावर नेले - विनय मेहेर

"मुलगा हट्ट करत होता. त्यामुळे त्याला मतदान केंद्रावर घेऊन गेलो होतो. चुकून व्हिडीओ शूट करुन तो फेसबुकवर अपलोड केला. माझं काही चुकीचं उद्दिष्ट नव्हतं," अशी प्रतिक्रिया विनय मेहेर यांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग भाजप नेत्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जर तक्रार योग्य असेल तर गुन्हा नोंदवण्यात येईल. तसेच प्रकरणाशी संबधित अधिकाऱ्यांनाही निलंबित केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी