शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

यूपी-दिल्लीचे जागावाटप ठरले, पण महाराष्ट्र अन् पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससमोर मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:50 IST

बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रातही अद्याप काही निर्णय होऊ शकलेला नाही.

LokSabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधआरी भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. याच दिशेने काँग्रेस एक-एक पक्षाला सोबत आणण्याचा प्रयत्न करत आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यात काँग्रेसला यश आले, पण त्यांच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठी कसरत करावी लागत आहे.

पश्चिम बंगालमध्ये वाद...पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे मन वळवण्यात काँग्रेसला यश आले नाही. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये TMC प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता, त्यामुळए काँग्रेसच्या अडचणी वाढत आहेत. असे मानले जाते की, काँग्रेसने टीएमसीकडे सुमारे 10 जागा मागितल्या होत्या, परंतु ममता फक्त दोन जागा देण्यास तयार आहेत. अद्याप जागांबाबत एकमत झालेले नाही. अधीर रंजन सातत्याने टीएमसीवर निशाणा साधत आहेत, त्यामुळेही जागावाटपाबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. या वादामुळे ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला हजेरी लावली नव्हती. अशातच काँग्रेस ममता बॅनर्जींची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. 

महाराष्ट्राची काय आहे परिस्थिती..?महाराष्ट्रातही महाविकासआघाडीने अद्याप जागावाटपाचा आराखडा जाहीर केलेला नाही. काँग्रेस, शिवसेना (बाळासाहेब उद्धव ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागांच्या गोंधळावर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंशीही चर्चा केली असून, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या लोकसभेच्या सहापैकी तीन जागांवर काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे, तर उद्धव ठाकरेंना मुंबईसह लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवायची आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय होणऊ शकतो. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे