शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कैरानाचा धडा; ऊस उत्पादकांच्या मतांसाठी मोदींनी लगावला 'हा' मास्टरट्रोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 17:06 IST

ऊस उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकार कामाला लागलं

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कैराना आणि नुरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला ऊस उत्पादकांच्या नाराजीचा फटका बसला होता. ऊस उत्पादकांची हीच नाराजी कायम राहिल्यास त्याचे परिणाम 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात सहन करावे लागू शकतात. त्यामुळेच कैराना आणि नुरपूरमधील पराभवातून धडा घेत मोदी सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाछी प्रयत्न सुरू केले आहेत. 2014 प्रमाणेच 2019 मध्येही उत्तर प्रदेशात कमळ फुलवण्यासाठी मोदी सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांची 20 हजार कोटी रुपयांची देणी फेडणार असल्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला आहे. यासोबतच साखरेवरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं 30 लाख टनांचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. कैरानात भाजपाला पराभव पत्करावा लागल्यानं मोदी सरकारनं हा निर्णयांचा धडका लावला असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान संघर्ष समितीनं दिली आहे. उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठं ऊस उत्पादक राज्य आहे. पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशात सर्वाधिक ऊस उत्पादन होतं. पश्चिम उत्तर प्रदेशाला तर ऊसाचं कोठार समजलं जातं. बागपत, कैराना, मुझफ्फरनगर, सहारनपूर, बिजनोर, मेरठ, मुरादाबाद, गाझियाबाद, अमरोहा, अलिगढ, लखीमपूर खिरी, सीतापूर, शाहजहापूर, बाराबंकी,  फैजाबाद, गोरखपूर, कुशीनगर, महाराजगंज, देवरिया, बलिया आणि मऊसह जवळपास 40 लोकसभा मतदारसंघात ऊसाचा प्रश्न महत्त्वाचा ठरु शकतो. त्यामुळेच ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सध्या सरकारकडून सुरू आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९kairanaकैरानाUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा