Lokmat Parliamentary Awards: राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा 'सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू' पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 07:16 PM2023-03-14T19:16:27+5:302023-03-14T19:18:22+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांना त्यांच्या राज्यसभेतील उत्कृष्ट कार्य आणि योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Lokmat Parliamentary Awards: Rajya Sabha MP Vandana Chavan honored with 'Best Woman Parliamentarian' award | Lokmat Parliamentary Awards: राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा 'सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू' पुरस्काराने सन्मान

Lokmat Parliamentary Awards: राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा 'सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू' पुरस्काराने सन्मान

googlenewsNext

Lokmat Parliamentary Awards: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांना लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटूचा ((Best Woman Parliamentarian of the Year) पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यसभेतील उत्कृष्ट कामासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २०१२ पासून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

वंदना चव्हाण यांची मार्च १९९७-१९९८ या कालावधीसाठी पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. महापौर या नात्याने त्यांनी आपल्या पक्षांतर्गत आणि बाहेरून विरोध होत असताना, किनारी गावांच्या विकास आराखड्यात जैवविविधता उद्यान (बीडीपी) या संकल्पनेचा समावेश केला. काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांनी त्यांना राजकारणात संधी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, मात्र त्यानंतर वंदना चव्हाण यांनी राष्ट्रवादीत जाणे पसंत केले.

लोकमत संसदीय पुरस्कारांची चौथी आवृत्ती मंगळवारी नवी दिल्लीत पार पडली. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार वंदना चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट येथील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा भव्य सोहळा पार पडला.

Web Title: Lokmat Parliamentary Awards: Rajya Sabha MP Vandana Chavan honored with 'Best Woman Parliamentarian' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.