शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

Lokmat Parliamentary Awards: खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळालीय; गोयल यांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 21:17 IST

काँग्रेससोबत शिवसेनेदेखील घणाघाती टीका

नवी दिल्ली: आम्हाला खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळाली. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य उज्ज्वल असल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावर भाष्य करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या जीडीपी वाढीचा दर सातत्यानं घसरत आहे. त्याबद्दल पीयूष गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. 2014 मध्ये आम्ही सत्तेत आलो. तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट स्थितीत होती. अडचणीत असलेली अर्थव्यवस्था आम्हाला वारशानं मिळाली आहे. अर्थव्यवस्था सक्षम करण्याचं काम आम्ही केलं असून आज भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढते आहे, असं गोयल यांनी सांगितलं. रेल्वेची अवस्था अतिशय बिकट असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यावरही गोयल यांनी भाष्य केलं. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं रेल्वेवर 22 हजार कोटींचा बोजा पडला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेत केली जाणारी गुंतवणूक दीडपटीनं वाढली आहे. मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याशिवाय सुरक्षेवर केला जाणारा खर्चदेखील वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.  

पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रात झालेल्या घडामोडींवरुन शिवसेनेला धारेवर धरलं. आम्ही युती म्हणून लढलेल्या 288 पैकी 164 जागा जिंकलो. भाजपानं 164 जागा लढवून 105 जागांवर विजय मिळवला. याचा अर्थ आम्ही लढवलेल्या 65 ते 70 टक्के जागा जिंकल्या. जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या, तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे, अशी घणाघाती टीका गोयल यांनी केली.

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डpiyush goyalपीयुष गोयलcongressकाँग्रेस