शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: देशातील इतर माध्यम समूहांनीही 'लोकमत'सारखी परंपरा जोपासायला हवी- माजी राष्ट्रपती Ramnath Kovind

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 20:24 IST

लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते.

Lokmat Parliamentary Awards: लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कार्यक्रमातील प्रमुख भाषणात सर्व पुरस्कार विजेत्या खासदारांचे अभिनंदन केले. यावेळी माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले, "सर्व पुरस्कार विजेत्या संसद सदस्यांनी त्यांच्या ज्ञानाने आणि बुद्धी व वाक्चातुर्याने संसदीय प्रतिष्ठा समृद्ध केली आहे आणि इतर संसद सदस्यांसमोर एक अनुकरणीय उदाहरण ठेवले आहे. मला हे जाणून आनंद होत आहे की लोकमत समूह संसदीय पुरस्कारासोबतच देशातील सर्वोत्कृष्ट सरपंचांचाही पुरस्कार देतो. देशातील इतर माध्यम समूहांनीही खासदार, आमदार आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा जोपासायला हवी.

"देशातील इतर माध्यम समूहांनीही खासदार, आमदार आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा जोपासायला हवी. देशातील जनतेला विशेषतः गरीब जनतेला लोकप्रतिनिधींकडून खूप आशा आहेत. आपल्या लोकप्रतिनिधींकडून आपले जीवन चांगले व्हावे, अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही लोकशाहीची कसोटी आहे. खरे तर ग्रामसभा, विधानसभा आणि संसदेतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे एकच प्राधान्य असायला हवे, ते देशहित आणि राष्ट्रहितासाठी काम करणे. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या अतुलनीय योगदानामागे हाच आत्मा असावा," असे कोविंद म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि लोकमत समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा उपस्थित होते.

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डRamnath Kovindरामनाथ कोविंदLokmatलोकमतPresidentराष्ट्राध्यक्ष