Lokmat Parliamentary Awards:"नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून भाजपा जिन्नांना पुन्हा जिवंत करतेय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:19 IST2019-12-10T16:19:39+5:302019-12-10T17:19:36+5:30
Lokmat Parliamentary Awards 2019 : नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे.

Lokmat Parliamentary Awards:"नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून भाजपा जिन्नांना पुन्हा जिवंत करतेय"
नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे. ते लोकमतच्या संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. राष्ट्राच्या आधारावर आपण नागरिकत्वाचा कायदा बनवत आहोत. मौलाना अब्दुल कलाम आझाद म्हणाले होते की, मी एक हिंदुस्थानी मुसलमान आहे, माझं या राष्ट्राशी 1 हजार वर्षांचं जुनं नातं आहे, याची आठवणही ओवैसी यांनी करून दिली आहे. मुसलमान असल्यानं आमचा त्या विधेयकात समावेश नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
श्रीलंकेच्या तमीळ, नेपाळमधल्या मधेशी यांचा या विधेयकात समावेश नाही. चीनकडे भारताचा एक तृतीयांश भाग आहे. त्यामुळे या विधेयकात चीनचाही समावेश करा. बांगलादेशालाही तुम्हीच बनवलं. टायगर सिद्दिकी या माणसानं मुक्ती वाहिनी तयार केली. पुढे त्याच मुक्ती वाहिनीनं बांगलादेशाच्या निर्मितीस मदत केली. भारताच्या मुस्लिमांचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मुस्लिमांशी काहीही संबंध नाही. तुम्ही जिनांचे विचार पुन्हा जिवंत करत आहात, असा आरोपही ओवैसींनी केला आहे.
बंगाली हिंदू आता सांगतील आम्ही भारतीय आहोत. एनआरसी करून सीएबी घेऊन याल, पण सीएबी हे आंबेडकर आणि गांधींच्या विरोधात आहे. प्रादेशिक पक्ष हे लोकशाहीसाठी चांगले आहेत. भाजपाला कोणत्याही विषयाचं देणं-घेणं नाही. महाराष्ट्रातही आमचे दोन आमदार आणि एक खासदार निवडून आलेले आहेत. आमचा राष्ट्रीय पक्ष नाही. इम्तियाज जलील शिवसेनेला हरवून खासदार झाले. इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांमुळे दिल्ली-औरंगाबाद तीन विमानांची सेवा सुरू झाली. निवडणुकीदरम्यान पावसानं अनेक पिकांची नासधूस झाली, असे मुद्दे इम्तियाज जलील यांनी उचलून धरले. प्रादेशिक मुद्द्यांवर राष्ट्रीय पक्ष जास्त लक्ष देत नसल्याचंही ओवैसींनी अधोरेखित केलं आहे.लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात. सोहळ्याआधी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम सभागृहात ‘राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, असदुद्दीन ओवैसी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले असून, त्यांनी मतप्रदर्शन केलं आहे. 2017पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली असून, 2018मध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एन. के. प्रेमचंद्रन, निशिकांत दुबे, सुष्मिता देव, रमादेवी, मीनाक्षी लेखी, हेमामालिनी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पहिल्या वर्षी शरद पवार, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, जया बच्चन, कनिमोळी, रजनी पाटील, छाया वर्मा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यात ग्रामपंचायत, विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आता पुरस्काराने गौरविले जाते.