शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

लोकमत संसदीय पुरस्कार सोहळा आज दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:58 AM

आठ सदस्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार : ‘राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान’ या विषयावर ‘लोकमत कॉन्क्लेव्ह’

नवी दिल्ली : लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान गुरुवारी ‘लोकमत’संसदीय पुरस्कार सोहळ्याद्वारे दिल्लीतील समारंभात होणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांची उपस्थिती असेल. हा सोहळा डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या सभागृहात सायंकाळी होणार आहे.

लोकमतच्या दिल्ली आवृत्तीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आधी ‘राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान’ या विषयावर ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या कॉन्क्लेव्हमध्ये ओमर अब्दुल्ला, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाखती ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा व बरखा दत्त घेतील. ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये वक्ते काय बोलतात याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.शरद पवार, जोशी ‘जीवनगौरव’चे मानकरीच्उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्या जाणाºया लोकमत संसदीय पुरस्कारातील जीवनगौरव पुरस्कारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षखा. शरद पवार (राज्यसभा) व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी (लोकसभा), यांची ज्युरी बोर्डाने निवड केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील भाजपा सदस्य निशिकांत दुबे यांची उत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड झाली आहे. संसदेत संस्मरणीय कामकाज करणाºया श्रीमती कणिमोळी, हेमा मालिनी, श्रीमती रमा देवी, छाया वर्मा या महिला खासदारांनाही लोकमत संसदीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. लोकमत संसदीय पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवर खासदारांची निवड करण्याचे काम ज्युरी मंडळाकडे सोपविण्यात आले होते.

टॅग्स :Lokmatलोकमतdelhiदिल्लीParliamentसंसदLokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८