शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat National Conclave: नागालँडमध्ये राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य? मीनाक्षी लेखींचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:38 IST

Lokmat Parliamentary Awards 2022 : नागालँडमधील भाजपाच्या आघाडी सरकारला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य आहे का, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.

नुकत्याच झालेल्या पूर्वोत्तर भारतातील तीन राज्यातील निवडणुकीत भाजपाने त्रिपुरामध्ये स्पष्ट बहुमतासह तर नागालँडमध्ये मित्रपक्षासोबत आघाडी करून सत्ता मिळवली होती. त्यानंतर नागालँडमधील भाजपाच्या आघाडी सरकारला शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य आहे का, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. भाजपाच्या नेत्या मीनाक्षी लेखी यांनी नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठिंबा भाजपाने स्वीकारला असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. 

लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत. या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांना नागालँडमध्ये भाजपा आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारले असता त्यांनी हे विधान केले.

मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, तो पक्षही लोकशाहीचाच भाग आहे. त्यामुळे आघाडी बनवली जाऊ शकते. यावेळी भाजपानेच  आघाडी केली तर लोकशाही का? असं विचारलं असता मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, आम्ही काँग्रेसच्या आघाडीवर काही बोललेलो नाही. तुम्ही निवडणुका लढवता. त्यातून तुम्ही काही जागा जिंकता. त्या जागांच्या आधारावर लोकांनी त्रिशंकू कौल दिला हे समोर आलं. स्पष्ट कौल दिलेला नाही.  तो समोर ठेवून सरकार बनवायचं होतं जनतेचंही हेच मत आहे. जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे, असं उत्तर त्यांनी दिलं. 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार