'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:18 IST2025-12-17T16:17:26+5:302025-12-17T16:18:20+5:30
Lokmat National Conclave 2025: ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव 2025’ मध्ये बोलताना मनोज झा यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
Lokmat National Conclave 2025: राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांनी नुकतीच पार पडलेली बिहार विधानसभा निवडणूक आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. 'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', असे मत झा यांनी मांडले. ते नवी दिल्लीत आयोजित ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव 2025’ मध्ये बोलत होते.
मनोज कुमार झा आणि सुनील तटकरे मंचावर
आज या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात राज्यसभा खासदार मनोज कुमार झा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मनोज झा यांनी बिहार विधानसभा निवडणुका, तसेच निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. भाजप सरकारच्या काळातील निवडणूक प्रक्रियेवर टीका करताना मनोज झा म्हणाले, आर्थिक ताकदीच्या जोरावर आज निवडणुका जिंकल्या जात आहेत. आता निवडणुका पूर्वीसारख्या वाटत नाहीत.
बिहार निवडणुकांवर टीका
बिहार विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना मनोज झा यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 'रेवडी' योजनांवर आक्षेप घेतला. सरकारकडून थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करतात. आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव 2025’
देशातील ज्वलंत राजकीय, आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर मोकळ्या आणि स्पष्ट चर्चेसाठी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष तसेच उद्योगजगत आणि धोरण तज्ज्ञ एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने या कॉन्क्लेवमध्ये देशाची दशा आणि दिशा ठरवणाऱ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होत आहे.