लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरून घसरली, मोठी दुर्घटना टळली
By Admin | Updated: May 21, 2017 18:10 IST2017-05-21T18:10:41+5:302017-05-21T18:10:41+5:30
उत्तर प्रदेशमधील उन्नाव रेल्वे स्टेशनवर रविवारी मोठा रेल्वे अपघात टळला. आज दुपारी 1.45 च्या सुमारास लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे उन्नाव

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरून घसरली, मोठी दुर्घटना टळली
ऑनलाइन लोकमत
उन्नाव, दि. 21 - उत्तर प्रदेशमधील उन्नाव रेल्वे स्टेशनवर रविवारी मोठा रेल्वे अपघात टळला. आज दुपारी 1.45 च्या सुमारास लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे उन्नाव स्थानकातील प्लॅटफॉर्म नं. तीनवर घसरले. मात्र या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
या अपघातामुळे रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रेल्वे स्थानकावरही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कडक उन्हाळा आणि सुविधांच्या अभावामुळे अपघातानंतर अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. उन्नावच्या एपी नेहा पांडे यांनी सांगितले की मुंबईहून लखनौला जाणाऱ्या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे उन्नाव रेल्वे स्थानकात घसरले. मात्र रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. मात्रा या अपघातामुळे दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर एका गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
मात्र या अपघातामागे दहशतवादी संघटनांचा हात असण्याची शक्यता लखनौ विभागाचे एडीजी अभय कुमार प्रसाद यांनी फेटाळून लावली आहे.
Uttar Pradesh: 8 bogies of Lokmanya Tilak Superfast Express derailed at Unnao railway station. No casualties/ injuries reported pic.twitter.com/ws2bDbrDGK
— ANI UP (@ANINewsUP) May 21, 2017