lok sbha electin 2019 15 MLAs ready to resign in gujarat | 'कॉंग्रेसचे 15 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत'
'कॉंग्रेसचे 15 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत'

गुजरात – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनामे देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. त्यातच आता, गुजरातमधील 15 कॉंग्रेसचे आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा ठाकूर सेनेचे प्रमुख व आमदार अल्पेश ठाकूर यांनी केला आहे. कॉंग्रेसमध्ये प्रत्येकजण नाराज आणि असमाधानी आहे. 'पुढे पहा काय होते' असा सूचक इशारा सुद्धा ठाकूर यांनी दिला. 2017  च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून राधनपुर मतदार संघातून अल्पेश ठाकूर आमदार म्हणून निवडून आले होते.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेल्या अपयशानंतर कॉंग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कॉंग्रेसमध्ये राजीनामे देण्याची जणू लाट आली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच, गुजरात मधील 15 नाराज आमदार कॉंग्रेसचा हात सोडणार असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर यांच्या दाव्याने कॉंग्रेसची मोठी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ज्याप्रकारे काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व संभ्रमात आहे, त्याचे पडसाद गुजरातमध्ये उमटत असल्याचे  ठाकूर म्हणाले. ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसला सोडले होते. त्यांनतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.

 

ठाकूर यांनी सोमवारी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची भेट घेतली. यांच्या भेटीनंतर ठाकूर हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली. मात्र ठाकूर  यांनी, मी माझ्या परिसरातील पाण्याच्या समस्येसंदर्भात नितीन पटेल यांची भेट घेतली असल्याचा खुलासा केला. मी माझ्या लोकांसाठी काम करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी सरकारच्या मदतीने चांगले कार्य केले जाऊ शकते असे ठाकूर  म्हणाले.

 


 


Web Title: lok sbha electin 2019 15 MLAs ready to resign in gujarat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.