'तुमचे भाषण चांगले नाही, मी सभागृहात येणार नाही'; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:56 PM2023-08-02T14:56:07+5:302023-08-02T14:57:54+5:30

संसदेत गोंधळ आणि वेळेचा अपव्यय यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले आहेत.

lok sabha speaker om birla angry on uproar says will not come to house | 'तुमचे भाषण चांगले नाही, मी सभागृहात येणार नाही'; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला का संतापले?

'तुमचे भाषण चांगले नाही, मी सभागृहात येणार नाही'; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला का संतापले?

googlenewsNext

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू होऊन जवळपास दोन आठवडे उलटले आहेत, मात्र आजपर्यंत एक दिवसही कामकाज सुरळीत होऊ शकलेले नाही. मणिपूर, दिल्ली सेवा विधेयकासह अनेक मुद्द्यांवर विरोधकांचा गदारोळ सुरू असून, त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होत नाही. सत्ताधारी पक्षही आपल्या अटींवर ठाम असल्याने सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, संसदेतील गदारोळ आणि वेळेचा अपव्यय यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले आहेत. त्यांनी लोकसभेत न येणार नसल्याचे म्हटले आहे. 

मला अपराधी वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर पुस्तक लिहिता येईल - गडकरी 

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांच्या वागणुकीवर सभापती ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत खासदारांचे वर्तन सुधारत नाही आणि ते सभागृहाची प्रतिष्ठा पाळत नाहीत तोपर्यंत लोकसभेत येणार नाही, असे बिर्ला यांनी दोन्ही पक्षांना सांगितले आहे. 

बुधवारीही सभागृहाच्या कामकाजादरम्यान लोकसभा अध्यक्ष आपल्या खुर्चीवर दिसले नाहीत. लोकसभा अध्यक्षांनी अनेक वेळा खासदारांना गोंधळाबद्दल इशारा दिला होता आणि त्यांनी सन्मानाचे पालन करण्याचे आवाहन केले होते.

मला अपराधी वाटतेय: नितीन गडकरी

 

आज राज्यसभेत एका प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कुठे स्तुती तर कुठे हतबलता अनुभवली. कामकाजावेळी त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी मला अपराधी असल्यासारखे वाटतेय, मुंबई-गोवा, सीधी-सिंगरौली हायवेंवर एक पूर्ण पुस्तक लिहून होईल असे गडकरी म्हणाले. 

भाजप खासदार अजय प्रताप यांनी गडकरींचे कौतुक करताना म्हटले की, संपूर्ण देशात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे. यावर राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनाही हसू आले. गडकरींच्या वाहतूक क्षेत्रातील कामाचेही त्यांनी कौतुक केले. केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे, असे धनखड म्हणाले. 

सिंहांच्या या मुद्द्यावर गडकरींनी उत्तर दिले. हे अगदी बरोबर आहे. याचे उत्तर देताना मला अपराधी वाटते. मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली यावर संपूर्ण पुस्तक लिहिता येईल, असे गडकरी म्हणाले. या रखडलेल्या रस्त्याची कहाणी सांगताना गडकरी म्हणाले की, हे काम रखडले असताना कोल इंडियाकडे पैसे मागून हा रस्ता करण्याचे समोर आले होते. यावर कोल इंडियाचे प्रस्ताव आले. यावर कोल इंडियाचे प्रस्ताव आले. दुर्दैवी आहे की याचे माझ्याकडे काहीच उत्तर नाही, असे गडकरी म्हणाले. 

Web Title: lok sabha speaker om birla angry on uproar says will not come to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.