शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास प्रस्ताव: सरकारची अग्निपरीक्षा की लुटूपुटूची लढाई? हे आहे समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 16:07 IST

लोकसभेत शुक्रवारी अविश्वास ठरावावर चर्चा

नवी दिल्ली - पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यानं लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव दाखल करुन घेतला. आता शुक्रवारी या प्रस्तावावर चर्चा होईल. मोदी सरकार पहिल्यांदाच अविश्वास ठरावाचा सामना करत असल्यानं शुक्रवारचा दिवस भाजपासाठी महत्त्वाचा आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल करताच यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांना संख्याबळाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोण म्हणतं आमच्याकडे संख्याबळ नाही, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मात्र आकडेवारी लक्षात घेतल्यास लोकसभेत भाजपाची स्थिती अतिशय मजबूत आहे. लोकसभेत एकट्या भाजपाचे 273 खासदार आहेत. याशिवाय शिवसेनेचे 18, लोकजनशक्ती पक्षाचे 6, शिरोमणी अकाली दलाचे 4 आणि अन्य पक्षांचे 9 खासदार भाजपाच्या बाजूनं आहेत. त्यामुळे सरकारचं संख्याबळ 310 वर जातं. लोकसभेतील भाजपाचं संख्याबळ पाहता, अविश्वास प्रस्तावाचा सामना करणं त्यांच्यासाठी फारसं आव्हानात्मक नाही. मात्र मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची एकजूट होत असल्याचा संदेश देण्यासाठी हा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची ही एकजूट भाजपासाठी डोकेदुखी ठरु शकते. कैरानासह लोकसभेच्या अनेक पोटनिवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपाचा पराभव केला आहे. अविश्वास प्रस्तावामुळे सरकार कोसळणार नाही, याची कल्पना टीडीपी, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना आहे. मात्र तरीही विरोधकांची एकी दाखवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीLoksabhaलोकसभाSonia Gandhiसोनिया गांधीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन