शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

'सुरक्षा रक्षकांनी नाही तर खासदारांनी आरोपींना पकडले', अधीर रंजन यांनी सांगितली संपूर्ण घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 14:54 IST

Lok Sabha Security Breach: संसदेच्या सुरक्षेत आज मोठी चूक घडली. संसद परिसरात तिघांनी स्मोक बॉम्ब फोडून गोंधळ घातला.

Security Breach in Lok Sabha: आज संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक घडली. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून अचानक दोन तरुणांनी सभागृहात उडी मारली अन् गोंधळ घातला. यासोबतच सभागृहात स्मोक बॉम्बही फोडला. यावेळी भाजप खासदार मनोज कोटक, मलूक नागर आणि इतर काही खासदारांनी त्यांना पकडले. काही वेळातच सुरक्षा रक्षकांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. 

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, दोन तरुणांनी अचानक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ते बाकावर चढले आणि स्मोक बॉम्बही फोडला. सुरुवातीला आमच्या काही सहकारी खासदारांनी त्यांना पकडले. त्यानंतर सुरक्षा अधिकारी त्या दोघांना बाहेर घेऊन गेले. ही निश्चितच सुरक्षेतील मोठी त्रुटी आहे. 

विशेष म्हणजे, आज 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याला बावीस वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी पुन्हा संसदेत अशाप्रकारची घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्ररणी दिल्ली पोलिसांनी दोन तरुणांसह एका महिलेला ताब्यात घेतले आहे. नीलम सिंह, अमोल शिंदे आणि सागर शर्मा अशी तिंघांची नावे आहेत. नीलम(वय42) हरियाणातील हिसारची रहिवासी आहे, तर अमोल शिंदे (वय 25) महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहेत. तिसऱ्याची माहिती समोर आलेली नाही.

नेमकं काय घडलं?नेहमीप्रमाणे आज संसदेचे कामकाज सुरू होते. यावेळी अचानक एकाने लोकसबेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोक बॉम्ब फोडून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तर, सभागृहाबाहेरही इतर दोघांनी स्मोक बॉम्ब फोडून गोंधळ घातला.  मिळालेल्या माहितीनुसार, सागरने लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उडी मारली, तर अमोल आणि नीलम यांनी संसदेबाहेर स्मोक बॉम्ब फोडला. यावेळी तिघांनाही अटक करण्यात आली असून, दिल्ली पोलीस आणि आयबी त्यांची चौकशी करत आहे. 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी