शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 17:48 IST

Lok Sabha Security Breach: आज संसदेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात स्मोक कँडल फोडून प्रचंड गोंधळ घातला.

Security Breach in Lok Sabha: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी (13 डिसेंबर) सुरक्षेत मोठी चूक घडली. लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुण अचानक संसदेत घुसले आणि त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून सभापतींच्या खुर्चीकडे धाव घेतली, तसेच त्यांनी स्मोक कँडलही फोडला. काही वेळातच दोन्ही हल्लेखोर पकडले गेले. यावेळी काही खासदारांनी त्यांना बेदम चोपही दिला.

संबंधित बातमी-  'माझ्या मुलाला फाशी द्या...' संसदेत स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया

लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले आणि त्यांनी टेबलावरुन सभापतींच्या खुर्चीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचे स्मोक कँडलही फोडले. यावेळी खासदार हनुमान बेनिवाल, मनोज कोटक, मलूक नागर यांच्यासह काही खासदारांनी त्या आरोपींना पकडले. यावेळी खासदारांनी आरोपीला बेदम चोपही दिला. 

पाहा व्हिडिओ:-

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, दोन तरुणांनी अचानक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ते बाकावर चढले आणि स्मोक कँडलही फोडले. सुरुवातीला आमच्या काही सहकारी खासदारांनी त्यांना पकडले. त्यानंतर सुरक्षा अधिकारी त्या दोघांना बाहेर घेऊन गेले. 

प्रत्यक्षदर्शी मोहन दानप्पा काय म्हणाले?प्रेक्षक गॅलरीत उपस्थित प्रत्यक्षदर्शी मोहन दानप्पा यांनी सांगितले की, आम्ही लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी आलो होतो. आम्ही पहिल्या गॅलरीत होतो. आरोपी गॅलरी दोनमध्ये होता. त्याने अचानक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि स्मोक बॉम्ब फोडले. खासदारांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला, यानंतर आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. 

आरोपींमध्ये कोण?मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये सागर शर्मा(रा. लखनौ, उत्तर प्रदेश), अमोल शिंदे(रा. लातूर, महाराष्ट्र), नीलम सिंह(रा. हरियाण), मनोरंज गौडा(रा.म्हैसूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत आणखी कोण कोण होते, याचा शोध घेतला जातोय. दिल्ली पोलीस आणि आयबी आरोपींची चौकशी करत आहे. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाCrime Newsगुन्हेगारीMember of parliamentखासदारBJPभाजपाcongressकाँग्रेस