शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'भारत माता की जय' न म्हणणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त व्हायला नको का? - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 14:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (25 एप्रिल) बिहारच्या दरभंगा येथील प्रचारसभेत दहशतवादावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (25 एप्रिल) बिहारच्या दरभंगा येथील प्रचारसभेत दहशतवादावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'महामिलावट करणारी लोक सांगतात की दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही. दहशतवादाने श्रीलंकेत 350 लोकांचे प्राण घेतले, मग हा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही का? आपल्या शेजारी दहशतवाद्यांची फॅक्टरी सुरू आहे' ''भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' असं म्हणायला प्रोब्लेम आहे. मग अशा लोकांचं डिपॉझिट जप्त व्हायला नको का?' असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (25 एप्रिल) बिहारच्या दरभंगा येथील प्रचारसभेत दहशतवादावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'महामिलावट करणारी लोक सांगतात की दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही. दहशतवादाने श्रीलंकेत 350 लोकांचे प्राण घेतले, मग हा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही का? आपल्या शेजारी दहशतवाद्यांची फॅक्टरी सुरू आहे' असे मोदींनी म्हटले आहे. तसेच काही लोकांना ''भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' असं म्हणायला प्रोब्लेम आहे. मग अशा लोकांचं डिपॉझिट जप्त व्हायला नको का?' असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. 

मोदींनी 'भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणाच आमच्या आयुष्यातील शक्ती आहे. आपल्या आजुबाजूला दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे आणि काही लोक दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही असं म्हणतात. दहशतवादाने श्रीलंकेत 350 हून अधिक लोकांचे प्राण घेतले, मग हा प्रमुख मुद्दा वाटत नाही का?' असा सवालही विचारला. 'महामिलावट' करणाऱ्यांसाठी दहशतवाद हा प्रमुख मुद्दा नसेल, पण भारतात दहशतवाद ही एक मोठी समस्या आहे. गरिबांचे सर्वाधिक नुकसान दहशतवादामुळेच झाले, असा दावा मोदींनी केला आहे. तसेच तुमचे एक मत मोदींना दिले तर मोदी दहशतवाद संपवल्यावरच शांत बसणार, आपला देश हा मजबूत असायला पाहिजे आणि त्यासाठी देशात एक मजबूत सरकार हवं. तुमचे एक मत दहशतवाद संपवू शकते आणि यासाठी तुम्ही चौकीदाराला पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला  

राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथील प्रचारसभेत विरोधकांवर निशाणा साधला होता. पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप असल्याचा टोला मोदींनी विरोधकांना लगावला आहे. झारखंडमध्ये बुधवारी (24 एप्रिल) एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी विरोधकांवर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांनी 'आधी विरोधक माझ्यावर टीका करत होते, पण कालपासून त्यांनी ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. असं दिसतंय की पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचं त्यांनी ठरवलं आहे. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी परिक्षेत पेपर चांगला गेला नाही तर पेन नीट चालत नव्हता अशी कारण देतो अगदी त्याप्रमाणे' असं म्हटलं होतं.

झारखंडमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत 2014 लोकसभा निवडणुकीआधी भारतातही हेच सुरू होतं अशी टीका केली होती. 'श्रीलंकेत दहशतवाद्यांनी चर्च आणि इतर ठिकाणी कशाप्रकारे दहशतवादी हल्ला केला हे तुम्ही पाहिलं असेल. 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतदेखील त्याच परिस्थितीतून जात होता' असं मोदींनी म्हटलं होतं. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा