शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुका वेळेवरच! मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते घोषणा, भाजपनं ५८ दिवसांचा कार्यक्रम तयार केला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 06:28 IST

'या' ४ वर्गांवर लक्ष...

संजय शर्मा - 

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या तारखा डोळ्यासमोर ठेवूनच पक्षाने पुढील ५८ दिवस  निवडणूक प्रचाराची रणनीती तयार केली आहे. त्यामुळे निवडणुका एकतर लवकर होतील किंवा पुढे ढकलल्या जातील, या शक्यता जवळपास मावळल्याचे दिसत आहे. 

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी या चार वर्गाची मने जिंकण्याची देशव्यापी रणनीती भाजपने आखली आहे. 

भाजपच्या चार प्रमुख राष्ट्रीय सरचिटणीसांकडे या चार वर्गाची जबाबदारी देण्यात आली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे संपूर्ण लक्ष युवक, महिला, गरीब आणि शेतकरी या चार वर्गांवर असणार आहे. त्यामुळे भाजपची नवी घोषणा ‘अब की बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार’ महत्त्वाची आहे. या निवडणुकीत राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. 

यापूर्वी कधी झाल्या लोकसभा निवडणुका?                    २०१४        २०१९निवडणुकीची घोषणा        ५ मार्च        १० मार्चमतदानाचे टप्पे        ७ एप्रिल ते १२ मे    ११ एप्रिल ते १९ मेमतमोजणी                 १६ मे        २३ मेशपथविधी                 २६ मे        ३० मे

रविवारपासून आयोग राज्यांच्या दौऱ्यावर- लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग ७ जानेवारीपासून राज्यांच्या दौऱ्यांना प्रारंभ करणार आहे. आयोग सर्वप्रथम आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा दौऱ्यावर जाणार आहे. 

- मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, तसेच निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, अरुण गोयल हे दि. ७ ते १० जानेवारी दरम्यान आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा दौरा करतील. त्याआधी दि. ६ जानेवारीला उपनिवडणूक आयुक्त या दोन राज्यातील पूर्वतयारीबाबत निवडणूक आयोगाला माहिती देतील. 

- लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी उपनिवडणूक आयुक्तांनी याआधीच सर्व राज्यांत पाहणी केली आहे.

हा दाैरा नेमका कशासाठी?विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या आधी निवडणूक आयोग विविध राज्यांचा दौरा करतो. त्या राज्यांतील राजकीय नेते, वरिष्ठ पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत आयोग चर्चा करतो. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोग देशातील सर्व राज्यांचा, केंद्रशासित प्रदेशांचा दौरा करणार का याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. 

या चौघांवर मोठी जबाबदारी- तरुण चुघ यांच्याकडे गरीब, महिला आणि तरुण या तीन वर्गांचे काम सोपविले आहे. त्यांना अनुसूचित जाती मोर्चाचे प्रभारी बनविण्यात आले असून, त्यांच्याकडे महिला गटाची जबाबदारीही देण्यात आली आहे. सेल्फ हेल्प ग्रुप अंतर्गत एक कोटी महिलांना जोडण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.- राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना ओबीसी मोर्चाचे प्रभारी बनविण्यात आले आहे. ओबीसी समुदायही गरीब वर्गात येतो.- सुनील बन्सल यांना युवा मोर्चाचे प्रभारी, तर बंडी संजय कुमार यांना किसान मोर्चा प्रभारी करण्यात आले आहे. - युवक, महिला, गरीब आणि शेतकरी या चार वर्गांवर लक्ष केंद्रित करून भाजप या वर्गांना जोडण्यासाठी मोठी रणनीती बनवत आहे. या चारही वर्गांना विरोधी पक्षांच्या जातनिहाय जनगणनेचे प्रत्युत्तर म्हणून पहिले जात आहे.

केंद्रीय नेतृत्व राज्यांना देईल योजनालोकसभा निवडणुकीपूर्वी १५ जानेवारीपर्यंत भाजपचे केंद्रीय नेतृत्व देशातील सर्व राज्यांचा दौरा करेल. तसेच, या राज्यांना निवडणूक जिंकण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने आखलेली रणनीती सांगणार आहे. राज्यांमधील नेतृत्व ही योजना संपूर्ण राज्यात जिल्हा ते बुथ स्तरापर्यंत राबविणार आहे. या योजनेंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि जम्मूच्या सलग पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या सर्व राष्ट्रीय सरचिटणिसांना या योजनेंतर्गत विविध राज्यांमध्ये पाठविले जात आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी