शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 19:37 IST

Lok Sabha Elections 2024: "2024 च्या लोकसभा निवडणुकीत 2004 सारखी परिस्थिती पाहायला मिळेल. इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार."

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 2004 सारखी परिस्थिती पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, काँग्रेस आणि I.N.D.I.A आघाडी देशातील अनेक राज्यांमध्ये चमकदार कामगिरी करेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश म्हणाले, "I.N.D.I.A आघाडी यावेळी देशातील अनेक राज्यांमध्ये चांगली कामगिरी करेल. काँग्रेस पक्ष 20 वर्षांपूर्वीस म्हणजेच 2004 सारख्या स्थितीकडे वाटचाल करत आहे. पक्ष राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस मोठी मुसंडी मारेल. याशिवाय छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आसाममध्येही पक्षाची स्थिती सुधारेल. पहिल्या दोन टप्प्यांनंतर दक्षिणेत भाजपचा सफाया झाला आहे आणि उत्तरेत निम्म्यापेक्षा कमी जागा मिळणार आहेत," असे ते म्हणाले.  

2004 च्या निकालावर जयराम रमेश काय म्हणाले?यावेळी रजराम रमेश यांनी एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केले. "2004 मध्ये एक्झिट पोलने NDA ला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली होती, पण प्रत्यक्षात निकाल उलटच झाला. 2019 मध्ये काँग्रेसला राजस्थानमध्ये 0, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 1 जागा मिळाली. पण, आता भाजपला उत्तर प्रदेशात 62, बिहारमध्ये 39 आणि पश्चिम बंगालमध्ये 18 जागा जिंकणेही अशक्य आहे. यावेळी I.N.D.I.A आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार आहे," असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालcongressकाँग्रेसBJPभाजपा