शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान तुमचे चौकीदार नव्हे तर अनिल अंबानी, नीरव मोदींचे चौकीदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 16:03 IST

नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ते अनिल अंबानी आणि नीरव मोदी यांचे चौकीदार आहे असं सांगितलं नाही असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात मी चौकीदार आहे मात्र ते कोणाचे चौकीदार आहेत हे जनतेला सांगत नाही. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या घराबाहेर चौकीदार बघितलाय का? बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर कधी चौकीदार बघितलाय का? मात्र अनिल अंबानी यांच्या घरी अनेक चौकीदार आहेत, त्याठिकाणी चौकीदारांची रांग लागलेली असते. नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ते अनिल अंबानी आणि नीरव मोदी यांचे चौकीदार आहे असं सांगितलं नाही असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. राहुल गांधी आज राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर लक्ष्य केले. आगामी निवडणूक ही दोन विचारांची लढाई आहे. एकीकडे देशात दुफळी माजवण्याचा विचार आहे तर दुसरीकडे बंधूभाव, प्रेम आणि लोकांना एकमेकांशी जोडण्याचा विचार आहे. मागील 5 वर्षापासून पंतप्रधान मोदी दोन भारत बनविण्याचा प्रयत्न करत आहे, एक खाजगी श्रीमंत लोकांचा तर दुसरा गरिब, शेतकरी आणि जवानांचे आहे. राहुल गांधी यावेळी म्हणाले की, भाजपाकडून अनेक आश्वासने दिली गेली, 15 लाख रुपये मिळाले नाही, 2 करोड नोकरी देण्याचं आश्वासनही पूर्ण नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही एवढचं काय तर जे तुम्ही बचत म्हणून साठवलेले पैसेही मोदी यांनी नोटाबंदी करुन तुमच्याकडून लुटले. ज्या लोकांना आम्ही गरिबीपासून मुक्त केले अशा लोकांना मोदी यांनी पाच वर्षात पुन्हा गरिब बनवले असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे सरकार जर सत्तेत आले तर भारतातील २० टक्के गरीबांच्या बँक खात्यात प्रतीवर्षी ७२,००० रुपये जमा करेल. म्हणजेच काँग्रेस ५ वर्षात ३,६०,००० रुपये गरीबांच्या बँक खात्यात जमा करुन दाखवेल असा विश्वासही राहुल गांधी यांनी जनतेला दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचा पहिला राजस्थान दौरा आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या वसुंधरा राजे यांना मात देत काँग्रेसचं सरकार राजस्थानमध्ये आलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधून काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. राजस्थानात एकूण 25 लोकसभा मतदारसंघ आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीRajasthanराजस्थानElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAnil Ambaniअनिल अंबानीNirav Modiनीरव मोदी