शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींची जात ठावूक नाही : प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 17:41 IST

भाजपच्या उमेदवारांकडून नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मागितले जाते. राष्ट्रवादावर मतं मागण्यात येत आहेत. मोदींमध्ये कोणता राष्ट्रवाद आहे, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. त्या सध्या अमेठीमध्ये राहुल यांचा प्रचार करत आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पाठोपाठ आता उत्तर प्रदेशात देखील आपण मागास जातीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण आता जातीच्या मुद्द्यांवर तापताना दिसत आहे. यात आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी जातीचा उल्लेख करणाऱ्या मोदींवर निशाना साधला आहे. पंतप्रधान मोदींची जात आपल्याला ठावूक नसून विरोधकांकडून त्यांच्या जातीचा आतापर्यंत उल्लेख झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर मागास असल्यामुळेच आपल्याला नीच संबोधले जाते असं मोदींनी एका सभेत म्हटलं होतं.

भाजपच्या उमेदवारांकडून नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मागितले जाते. राष्ट्रवादावर मतं मागण्यात येत आहेत. मोदींमध्ये कोणता राष्ट्रवाद आहे, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. त्या सध्या अमेठीमध्ये राहुल यांचा प्रचार करत आहेत.

प्रियंका यांच्याआधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनी मोदी विनाकारण निवडणुकीत जात काढत आहेत. तेजस्वी आधीच म्हणाले होते की, स्वत:ला नकली ओबीसी म्हणवणारे मोदी स्वत:ला दलित संबोधतात, परंतु, ते जन्मजात उच्चवर्णीय आहेत, असही त्यांनी म्हटले.

दरम्यान मायावती यांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदी उच्चवर्णीय होते. मात्र गुजरातमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी आपल्या जातीला मागास वर्गात समाविष्ट केले. मागास लोकांचा हक्क हिसकावण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी मोदी मागास वर्गात सामील झाल्याचा आरोप मायावती यांनी केला. तसेच मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्याप्रमाणे मोदी जन्मत: मागास नाहीत, असंही मायावती यांनी पत्रकार परिषदेते सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाmayawatiमायावतीTejas Expressतेजस एक्स्प्रेस