शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:24 IST

दिल्लीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय भाजप निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी देशातील अनेक राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली

नवी दिल्ली - दिल्लीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय भाजप निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी देशातील अनेक राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. आज भाजपच्या उमेदवारांची यादीची घोषणा करण्याची शक्यता आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी,  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक 11 एप्रिल रोजी होणार असून या पहिल्या टप्प्यातील मतदार संघातील उमेदवार यादी कालच्या बैठकीत अंतिम करण्यात आली.  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 मतदार संघात निवडणूक पार पडणार आहे.

आगामी लोकसभेसाठी काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. तर 40 नवीन चेहऱ्यांना रिंगणात उतरवणार आहे. ज्या विद्यमान खासदारांविरोधात मतदारसंघात नाराजी आहे अशांना पक्षाकडून उमेदवारी नाकारली जाणार असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून मिळाली आहे. तसेच काही खासदारांचे मतदार संघ बदलले जाण्याची शक्यता आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपा सूत्रांकडून मिळाली आहे. देशातील 28 राज्यांपैकी 12 राज्यांमध्ये भाजपाची आणि 6 राज्यांमध्ये भाजपा युतीची सत्ता आहे. यातील काही राज्यात भाजपविरोधी वातावरणाचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे या राज्यांमध्ये ज्या विद्यमान खासदारांविरोधात नाराजी आहे अशांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षनेतृत्त्वाने घेतला.

भाजपच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर सत्ताधारी भाजप आज पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीनंतर पहिल्या यादीतील 100 उमेदवारांची घोषणा होईल. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटकसह उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असल्याची औपचारिक घोषणाही आज होऊ शकते. 2014 मध्ये मोदींनी वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. भाजपच्या पहिल्या यादीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या 42 जागांसह पश्चिम यूपी, बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि महाराष्ट्रातील जागांचा समावेश असू शकतो. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सगळ्या जागांवर पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे. तर इतर राज्यांच्या काही जागांवर पहिल्या टप्प्यातही मतदान होणार आहे. 

राज्यात शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर राज्यात एकूण 25 जागांवर भाजपचे उमेदवार लढणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात निवडणूक असणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांची नावेही या यादीत असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी