शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

17 राज्यं, 28 प्रचारसभा अन् 150 प्रकल्प... निवडणूक घोषणेआधीचा मोदींचा अ‍ॅक्शन प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 12:23 IST

लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराचा धूमधडाका लावला होता. गेल्या महिनाभरात मोदींनी 17 राज्यांमध्ये जाऊन जवळपास 28 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या

‌नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराचा धूमधडाका लावला होता. गेल्या महिनाभरात मोदींनी 17 राज्यांमध्ये जाऊन जवळपास 28 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. या प्रचार सभा ज्या ठिकाणी घेतल्या गेल्या ती महत्त्वपूर्ण राज्य होती ती म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्य. 2014 लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर एनडीए सरकारचे सर्वाधिक खासदार याच राज्यांतून निवडून आले होते.

आंध्र प्रदेश राज्याचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाचा होता कारण या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणूकीसाठीही मतदान पार पडणार आहे. सध्या या राज्यात तेलुगू देसम पार्टीची सत्ता आहे. चंद्राबाबू नायडू या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशच्या मागील विधानसभा निवडणुकीत टीडीपीला 117 जागा, वायएसआर कॉंग्रेसला 70 जागा, टीआरएसला 63 जागा, कॉंग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र एकेकाळी एनडीएसोबत असणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएची साथ सोडून युपीएशी घरोबा केला आहे. भाजपविरोधी महाआघाडीमध्ये चंद्राबाबू नायडू यांचा सिंहाचा वाटा आहे. 

निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये 157 प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पाडले. यात महामार्ग, रेल्वे प्रकल्प, रुग्णालये, मेडीकल कॉलेज, मेट्रो, जल प्रकल्प यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला होता.

महाराष्ट्रात यवतमाळ, धुळे या ठिकाणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावत शेकडो कोटीच्या विकासकामाचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. तर सोलापूरात कष्टकरी कामगारांसाठी 30 हजार घरांचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडले, अलीकडेच नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिनाभरात २ लाख कोटींच्या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला. यात पंतप्रधान किसान सन्मान योजना, अमेठी येथे रायफलचा कारखाना, इंडीया गेटजवळ युद्धातील शहीदांचे भव्य स्मारक आणि बिहारसाठी ३३ हजार कोटी मदतीची घोषणा हे समाविष्ट आहे.

त्यामुळे एकंदर निवडणुकीच्या रणांगणात विरोधक निवडणूक घोषित होण्यासाठी वाट पाहत राहिले तर दुसरीकडे नरेंद्र मोदी सरकारने प्रचारात बाजी मारली असेच म्हणावे लागेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र