शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनो जागरुक व्हा, मतदान करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 11:06 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना जागरुक करा, मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांना केलं आहे

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना जागरुक करा, मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांना केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात निवडणुकीचे वारे वाहू लागलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉग देखील लिहला आहे. त्याचसोबत टिविट्ररवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, विरोधी पक्षांचे नेते, सर्व राज्यातील मुख्यमंत्री, क्रिडा क्षेत्रातील खेळाडू, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, गायक यांना मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करा असं आवाहन केलं आहे.

देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना मतदान करण्यासाठी जागरुक करा, मोठ्या प्रमाणात मतदान व्हायला हवं यासाठी राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांना टॅग करुन आवाहन केलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्राबाबू नायडू, एच डी कुमारस्वामी, नवीन पटनायक यांना टॅग करुन लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना मतदानासाठी जागरुक करा, मतदानाची टक्केवारी वाढवा असं आवाहन केलं आहे. 

 

नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हटलंय की, मतदान करणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपलं एक मत देशाच्या विकासासाठी महत्तपूर्ण असते. मतदानाचा अधिकार वापरुन आपण देशाच्या विकासाचं स्वप्न साकारु शकतो. देशात असं वातावरण बनवलं गेलं पाहिजे की, मतदान करणे गर्व आणि अभिमानास्पद वाटलं पाहिजे. विशेषत: जे यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी निवडणूक आणि मतदान करणे हा लोकशाहीचा उत्सव बनला पाहिजे. 

मतदान न करणाऱ्या व्यक्तीच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण व्हायला हवी. देशात काही चुकीचं घडत असेल तर देशातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला जबाबदार धरलं पाहिजे, जर मी मतदान केलं असतं तर माझ्या देशावर संकट आलं नसतं याच विचाराने मतदान करा. मतदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्या, मतदार यादीत तुमचं नावं आहे की नाही याची पडताळणी करा. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत जर कोणी सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचं नियोजन करत असाल तर मतदान केल्यानंतर बाहेर जा. स्वत:ही मतदान करा आणि दुसऱ्यालाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा असं आवाहन देशातील प्रत्येक नागरिकाला केलं आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानIndiaभारतElectionनिवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी