शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वयामुळे अडवाणींऐवजी अमित शहांना संधी - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 18:26 IST

मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपाच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी भाजपाने जाहीर केली आहे. या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपावर टीका होऊ लागली होती. मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपाच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले. 

गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आले. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अडवाणी आमचे मार्गदर्शक आहेत आणि कायम मार्गदर्शक राहतील. लालकृष्ण अडवाणी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यामुळे पक्ष त्यांचा आदर करते. मात्र अडवाणी यांनी वयाची 90 ओलांडली आहे. त्यामुळे वाढतं वय लक्षात घेता त्यांच्याजागी दुसऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगर मधून उमेदवारी देण्याचा निर्णय पार्टीने केला असं नितीन गडकरी यांनी सांगितले. 

अटल-अडवाणी युग भाजपात संपुष्टात आल्याचा आरोप केला जातो मात्र युग कधी संपत नाही, पार्टी पुढे जात राहते मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा योग्य तो सन्मान राखला जातो असं गडकरींनी स्पष्ट केलं.  

गांधीनगर मतदारसंघाचा इतिहास भाजपाच्या शंकरसिंह वाघेला १९८९ मध्ये येथून गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपाकडे आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा येथून निवडणूक लढविली. अटलबिहारी वाजपेयी १९९६ मध्ये विजयी झाले. पण लखनौमधूनही विजयी झाल्याने त्यांनी गांधीनगरचा राजीनामा दिला. नंतर पोटनिवडणुकीत भाजपाचेच हरिश्चंद्र पटेल निवडून आले. त्यानंतर पुन्हा लालकृष्ण अडवाणी यांनी हा मतदारसंघ राखला. गेल्या निवडणुकीमध्ये लालकृष्ण अडवाणी येथून ४ लाख ८३ हजार १२१ च्या मताधिक्याने विजयी झाले होते.  हा मतदारसंघ भाजपाचा गड मानला जातो त्यामुळे अमित शहा यांना उमेदवारी देऊन भाजपाने शहा यांच्यावरील भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीElectionनिवडणूकAmit Shahअमित शहा