शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

आपलं एक मत अमूल्य, तर बोटावरील एक थेंब शाईची किंमत कोटींच्या घरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 14:17 IST

केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाचं असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदाताच्या बोटावरची निळी शाई

म्हैसूर - केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाचं असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदाताच्या बोटावरची निळी शाई. तुम्हाला माहिती आहे का ? या बोटावरच्या शाईची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये जाते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 26 लाख बाटल्यांची ऑर्डर दिली आहे. देशभरात 90 कोटी मतदार संख्या असून त्यासाठी लागणाऱ्या निळ्या शाईच्या 26 लाख बाटल्या मागविण्यात आल्या आहेत. याची किंमत जवळपास 33 करोड रुपये आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला 11 एप्रिलपासून सुरुवात होतेय, 7 टप्प्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार असून 19 मे रोजी अंतिम मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. 23 मे रोजी मतदान मोजणी करण्यात येणार आहे.

2009 च्या निवडणुकीची तुलना करता यंदा निळ्या शाईच्या किंमतीत तीनपटीने वाढ झाली आहे. 2009 मध्ये निळ्या शाईची किंमत 12 करोड रुपये होती. तर मागील 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा साडेचार लाख बाटल्या अधिक मागविण्यात आल्या आहेत. एका बाटलीमध्ये 10 मिली निळी शाई असते. एका बाटलीमधून किमान 350 मतदारांवर निळ्या शाईचं निशाण लावू शकतो. 

2004 च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदाताच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता.मात्र 2006 रोजी निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ लाईन आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाईचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या देण्यात येतात. सर्वांत जास्त बाटल्यांचा वापर उत्तर प्रदेशात केला जातो. याठिकाणी 3 लाख बाटल्यांचा वापर करण्यात येतो. तर सर्वांत कमी बाटल्या लक्षद्वीप या राज्यात वापरण्यात येतात. याठिकाणी 200 बाटल्यांचा वापर होतो. मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई ही म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. सर्वप्रथम १९६२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. यानंतर देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला. यावेळी देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत होत्या. या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला.  

म्हैसूरची शाई  ही निळी शाई बोटावर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही. ही शाई म्हैसूर येथील म्हैसूर पेंटस् अ‍ॅण्ड वॉर्निश लि. कंपनीमध्ये तयार होते. या कंपनीकडून जगातील 25 देशांना निवडणुकीची शाई दिली जाते. आपल्या देशालाही निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देण्यात येते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानElectionनिवडणूक