शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 18:33 IST

loksabha Election Result - महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असून आता त्यात आणखी एका खासदाराची भर पडली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील १ लाखांच्या मताधिक्यांनी जिंकून आले. याठिकाणी मविआकडून उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला होता. मात्र ठाकरेंची मशाल पाडून विशाल पाटील खासदार झाले. आता त्याच विशाल पाटलांनी विश्वजित कदमांसोबत दिल्लीत जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिलं आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला जनतेने पराभूत केले.सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी दिग्गजांना ही योग्य श्रद्धांजली आहे. सांगलीतील खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितले. विशाल पाटलांच्या या पाठिंब्यामुळे देशात काँग्रेस खासदारांनी शतक गाठल्याचं दिसून येते. 

ठाकरेंनी व्यक्त केली होती नाराजी

सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती. मात्र त्याठिकाणी काँग्रेस नेते विशाल पाटील इच्छुक होते. मात्र काँग्रेसचा विरोध डावलून ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. याबाबत ठाकरे गटाकडून विशाल पाटलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. विशाल पाटलांना त्यांच्या नेत्यांनी समजवावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र ठाकरे गटाचा विरोध डावलून सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचा प्रचार केला. त्यामुळे या निवडणुकीत विशाल पाटील विजयी झाले. 

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार संजय पाटील यांनी २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा मतदारसंघाचे नेतृत्व केले. २०२४ च्या निवडणुकीत त्यांची हॅट्ट्रिक होणार होती, पण पक्षातंर्गतच विरोध झाल्यामुळे त्यांची हॅट्ट्रिक हुकली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेतून मोठ्या प्रमाणात उठाव झाला. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला. हे सर्व प्रश्न विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडले. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसvishal patilविशाल पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालsangli-pcसांगली