शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 17:52 IST

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल येणार आहेत. दरम्यान, निकालावरुन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे उद्या निकाल येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. देशात कोणाचे सरकार स्थापन होणार हे मंगळवारी २ जून स्पष्ट होणार आहे. मात्र, निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपचे  सरकार स्थापन होत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, निकालावरुन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी यावेळी इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, टीएमसी या विरोधी पक्षांचा समावेश आहे. काँग्रेसचे चाणक्य डीके शिवकुमार यांना एक्झिट पोलबाबत विचारले असता ते म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल.

राहुल गांधी यांनीही एक्झिट पोल फेक असल्याचे म्हटले आहे. हा एक्झिट पोल नाही, तर मोदी मीडिया पोल आहे. हा एक काल्पनिक कौल आहे, असंही गांधी म्हणाले.

लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट

दरम्यान, सोनिया गांधीही एक्झिट पोलवर टीका केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, "आता निकालाची वाट पहावी, फक्त थांबा आणि बघा. आम्ही पूर्ण अपेक्षा करतो की आमचे निकाल एक्झिट पोल दाखवत आहेत त्याच्या अगदी उलट असतील,असंही सोनिया गांधी म्हणाल्या. 

एक्झिट पोलचा अंदाज आले समोर

इंडियाला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी संध्याकाळी वर्तविला होता. पण त्यापेक्षाही कमी जागा इंडिया आघाडीला मिळतील असा अंदाज पाच एक्झिट पोलनी वर्तविला आहे. सात एक्झिट पोलने वर्तविलेल्या अंदाजांची सरासरी काढली तर एनडीएला सरासरी ३६१ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १४५ जागांवर समाधान मानावे लागेल असा निष्कर्ष निघतो.

भाजपला ३११ जागा तर काँग्रेसला ६३ जागा मिळतील. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलने व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीला १०९ ते १३९ जागा जिंकता येतील. तर जन की बात या एक्झिट पोलने एनडीला ३६२ ते ३९२ व इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा मिळतील असे म्हटले आहे. दैनिक भास्करने केलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८१ ते ३५० व इंडिया आघाडीला १४५ ते २०१ जागा मिळतील असे म्हटले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस