शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 Result : ना ४०० पार, ना ३७०, ना 3 तलाक, ना राममंदिराचा मुद्दा आला कामी; ‘या’ ६ राज्यांनी भाजपची शाळा केली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 18:31 IST

Lok Sabha Election Result 2024 Result : या निवडणुकीत भाजपने ४००+ चा नारा दिला होता. याशिवाय, कलम ३७०, तीन तलाक, सीएए, राम मंदिर, यूसीए आदी मुद्द्यांवर भर दिला होता.

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंतच्या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. तर विरोधी आघाडी असलेल्या I.N.D.I.A. ने जबरदस्त मुसंडी घेतल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या निकालात एनडीए २९६ जागांवर आघाडीवर दिसत आहे. यात भाजप जवळपास २४४ जागांवर आहे. तर I.N.D.I.A. २२९ जागांवर आघाडीवर दिसत आहे. यात काँग्रेसच्या ९८ जागा आहेत.

भाजपने निवडणूक प्रचारात या मुद्द्यांवर दिला होता भर, पण...या निवडणुकीत भाजपने ४००+ चा नारा दिला होता. याशिवाय, कलम ३७०, तीन तलाक, सीएए, राम मंदिर, यूसीए आदी मुद्द्यांवर भर दिला होता. मात्र प्रत्यक्षात हे मुद्दे आणि पीएम आवास यांसारख्या अनेक योजनाही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४०० पार पोहोचू शकले नाही. नव्हे, एकट्या भाजपला बहुमतापर्यंत आणि एनडीएला ३०० पार पोहोचवतानाही दिसत नाही.

‘या’ ६ राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका - भाजपला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक आणि राजस्थान या सहा राज्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राज्यांपैकी ही सहा राज्ये आहेत. केवळ या सहा राज्यांतच लोकसभेच्या एकूण २६३ जागा आहेत. यांपैकी २०१९ मध्ये एकट्या भाजपने तब्बल १६९ जागा जिंकल्या होत्या. 

यावेळी, लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात महत्वाच्या ठकरणाऱ्या उत्तर प्रदेशात ८० जागांपैकी केवळ ३१ जागांवर भाजप विजयी होताना दिसत आहे. तर समाजवादी पक्षाला ३८ तर काँग्रेसला ७ जागां मिळताना दिसत आहेत. खरे तर उत्तर प्रदेशात भाजपला राम मंदिराचा मोठा फायदा होईल, असे बोलले जात होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. याशिवाय, भाजप महाराष्ट्रात - ११, पश्चिम बंगालमध्ये - १२, बिहारमध्ये - १२, कर्नाटकात - १७, आणि राजस्थानात - १४ जागांवर आघाडीवर आहेत अथवा अशा साधारणपणे केवळ ९७ जिंकताना दिसत आहे. अर्थात २०१९ च्या तुलनेत तब्बल ७२ जागा कमी...

या ६ राज्यांत २०१९ मध्ये अशी होती भाजपची स्थिती - लोकसभा निवडणूक २०१९ चा विचार करता, तेव्हा भाजपला उत्तर प्रदेशात - ६२, महाराष्ट्रात - २३, पश्चिम बंगालमध्ये - १८, बिहारमध्ये - १७, कर्नाटक - २५ तर राजस्थानात - २४ अशा एकूण १६९ जागा जिंकल्या होत्या. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस