शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Lok Sabha Election Result 2024 : नितीश कुमार, चंद्राबाबू म्हणणार, हुकमी एक्के आम्हीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 06:57 IST

Lok Sabha Election Result 2024 : बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचा हात सोडून नितीशकुमार यांच्या जदयूने पाच महिन्यांपूर्वी एनडीएशी हातमिळवणी केली.

Lok Sabha Election Result 2024 :  नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ऐनवेळी भाजप प्रणीत एनडीएत सामील होणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे आता 'किंग मेकर' या नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचा हात सोडून नितीशकुमार यांच्या जदयूने पाच महिन्यांपूर्वी एनडीएशी हातमिळवणी केली. तर, १० वर्षांपासून भाजपशी फटकून वागणाऱ्या चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षानेही आंध्र प्रदेशात भाजपशी जुळवून घेतले. एनडीएच्या रथात ऐनवेळी बसलेल्या या दोन्ही पक्षांच्या ताटात भाजपने आपल्याकडील जागा वाढल्या. त्यानुसार बिहारमध्ये जदयूला १६ तर आंध्र प्रदेशात तेलुगू देसमला १६ जागा देण्यात आल्या.

बिहारी मतदारांनी केले जदयूवर शिक्कामोर्तबनितीशकुमार यांच्या जदयूने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली. त्यांनी लढविलेल्या १६ पैकी १४ जागांवर जदयूचे उमेदवार विजयी झाले आहेत. केंद्रात एकट्या भाजपची वाटचाल २५०च्या आत अडल्याने आता सत्तास्थापनेवेळी एनडीएत नितीशकुमारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २ तिसऱ्या टर्ममध्ये नितीशकुमार व त्यांच्या पक्षाला महत्त्व द्यावे लागेल. जदयूला मंत्रिमंडळात चांगली खाती देऊन त्याची परतफेड केली जाऊ शकते. एनडीएत जाण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयावर बिहारी मतदारांनी एका अर्थाने पसंतीचे शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट होत आहे.

एनडीएत येताच तेलुगू देसमची फिनिक्स भरारी१ दहा वर्षांपासून सत्तेपासून दूर राहिलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. लोकसभेपूर्वी चंद्राबाबूंनी भाजपशी सूत जुळवून घेतले. आंध्र प्रदेशातील चंचुप्रवेशासाठी भाजपनेही त्यांना १६ जागा दिल्या, तसेच विधानसभेतही युतीही केली. या निर्णयावर मतदारांनी मान्यतेची मोहोर उमटवली आहे.

चंद्राबाबूंचे १६ खासदार निवडून आले आहेत. तर, विधानसभेतही तेलुगू देसमने निर्णायक आघाडी घेतली आहे. एक प्रकारची संजीवनीच या निकालांमुळे त्यांना मिळाली आहे. ३००च्या आत अडकलेल्या एनडीएत चंद्राबाबूंचे वजनही वाढणार आहे. त्यामुळे केंद्रात तेलुगू देसमला मानाचे पान मिळण्याची शक्यता वधारली आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल