शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

NDAकडून सत्तास्थापनेचा दावा, INDIAची माघार; मात्र दीदी सक्रिय, ही चाल यशस्वी झाल्यास अडचणीत येईल मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 15:31 IST

Lok Sabha Election Result 2024: इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी सरकार स्थापन करण्याची आशा सोडली असं चित्र दिसत असलं तरी पडद्यामागे खूप हालचाही होत आहेत. तसेच काही जुळवाजुळव करून सरकार स्थापन करता येईल का, याबाबत चाचपणी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये बहुमत हुकल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांसह सरकार स्थापन करण्याची तयारी केली आहे. तसेच त्यासाठी आज भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावाही करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीकडून आपण सध्यातरी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी सरकार स्थापन करण्याची आशा सोडली असं चित्र दिसत असलं तरी पडद्यामागे खूप हालचाही होत आहेत. तसेच काही जुळवाजुळव करून सरकार स्थापन करता येईल का, याबाबत चाचपणी केली जात आहे. सरकार स्थापन करण्याची शक्यता तपासण्यासाठी सुरुवातीला शरद पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता ममता बॅनर्जी यांनी मोर्चा सांभाळला आहे. तसेच काँग्रेसने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्यावर सोपवली आहे.

त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे सातत्याने दिल्लीचे दौरे करत आहेत. तसेच अनेक नेत्यांच्या भेटीगाठीही घेत आहेत. अभिषेक बॅनर्जी यांनी आधी दिल्लीमध्ये आपचे नेते आणि नंतर सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनण्यासाठी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी ही ही अखिलेख यादव यांच्याकडे सोपवली आहे.

दरम्यान, अधिकृतरीत्या इंडिया आघाडीने सध्या घडत असलेल्या घटनाक्रमांवर लक्ष ठेवून योग्य वेळेची वाट पाहत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र तृणमूल काँग्रेस. शिवसेना ठाकरे गट आणि आप हे पक्ष भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्षांची संख्या वाढवण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या निकालांच्या दिवशीच समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली होती. तसेच ममता बॅनर्जी यांनी त्यांनी चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते. नीतीश कुमार आणि अखिलेश यादव यांचे चांगले संबंध आहेत. तसेच चंद्राबाबू नायडू हे अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यांचे  ९० च्या दशकातील सहकारी राहिले होते.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी