शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
3
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
4
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
5
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
6
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
7
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
8
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
9
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
10
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
11
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
12
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
13
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
14
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
15
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
16
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
17
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
18
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
19
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
20
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
Daily Top 2Weekly Top 5

कसा ठरतो लोकसभेचा विजयी उमेदवार? कशी होते मतमोजणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 05:20 IST

Lok Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज, सकाळी ८ पासून सुरुवात 

मुंबई : एकूण सात टप्प्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. देशाची १८ वी लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. एकूण ५४३ मतदारसंघातील उमेदवारांचे आणि देशाचे भवितव्य ठरणार आहे. ४  जून रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरू होणारी मतमोजणी कशा प्रकारे पार पडणार, हे जाणून घेऊ या.

व्हीव्हीपॅटमधील स्लिप कधी मोजल्या जातात?मतदान अचूक होते की नाही याची खात्री म्हणून व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जातो. यामध्ये मतदान केल्यानंतर  स्लिप व्हीव्हीपॅटमध्ये पडते. यावर उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि निशाणी छापलेली असते. मतांबाबत उमेदवारांनी शंका घेतल्यास किंवा चुकीची गणना केल्याचा आरोप असल्यास, व्हीव्हीपॅटमधील स्लिप मोजल्या जातात. अशा ठिकाणी  व्हीव्हीपॅट पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर केला जातो.

किती वाजता सुरू होते मतमोजणी?  सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात केली जाते.  राजकीय पक्ष व उमेदवारांनी नियुक्त केलेले मतदान अधिकारी, मतमोजणी एजंट सकाळी ५ वाजण्यापूर्वी मतमोजणी केंद्रावर पोहोचतात आणि सकाळी ६  वाजेपर्यंत मतमोजणी टेबलवर उपस्थित राहू शकतात.

मतमोजणीची जबाबदारी कुणावर?  मतदारसंघात निवडणूक आणि मतमोजणी घेण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी अर्थात रिटर्निंग ऑफिसरची असते. निवडणूक निर्णय अधिकारी हा सामान्यतः सरकारी अधिकारी असतो किंवा राज्य सरकारच्या सल्लामसलतीने प्रत्येक मतदारसंघासाठी  निवडणूक आयोगाद्वारे नामनिर्देशित केलेला स्थानिक प्राधिकारी असतो.निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली मतमोजणी केली जाते. तथापि, एका मतदारसंघासाठी अनेक ठिकाणी मतमोजणी होत असल्यास सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली देखील मतमोजणी होऊ शकते. 

मतमोजणी कुठे केली जाते? प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक पार पाडण्यासाठीची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर असून या अधिकाऱ्यांकडून मतमोजणीसाठी सरकारी शाळा, महाविद्यालये अथवा सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणे ठरवली जाऊ शकतात. मतमोजणी सामान्यतः एकाच सभागृहात होते. आयोगाकडून पूर्वपरवानगी घेऊन मतमोजणी हॉल आणि टेबल्सची संख्या वाढवली जाऊ शकते. 

प्रत्येक फेरीत किती मतमोजणी?मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत १४ ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाते. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी ३० मिनिटांत सुरू होते. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीच्या समाप्तीनंतर, १४ ईव्हीएममधील मतांच्या मोजणीतून गोळा केलेले निकाल जाहीर केले जातात. 

कोण राहू शकतात उपस्थित?    निवडणूक निर्णय अधिकारी तीन टप्प्यांची प्रक्रिया वापरून मोजणी पर्यवेक्षकांची नियुक्ती करतो.मतमोजणी सभागृहात उमेदवार, त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक प्रतिनिधी उपस्थित राहतात. 

४,३०९ टेबलवर होणार राज्यातील मतमोजणी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १४,५०७ अधिकारी-कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉलमध्ये ४,३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी होईल. ही मोजणी संपल्यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणी होईल. सुमारे एक लाख ते सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या मदतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालEVM Machineएव्हीएम मशीन