शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

Lok Sabha Election Result 2024 : भाजपची मदार आता मित्रांच्या सहकार्यावर, चार राज्यांमध्ये मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 06:51 IST

Lok Sabha Election Result 2024 : तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला एनडीएमधील घटक पक्षांवर पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात विसंबून राहावे लागणार आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे तसेच रा. स्व. संघाची नाराजीही त्या पक्षाला भोवली आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) चंद्राबाबू नायडू व जनता दल (युनायटेड)चे नितीशकुमार आता किंगमेकर बनले आहेत. त्या दोन नेत्यांच्या पाठिंब्याविना भाजपला केंद्रात सरकार स्थापन करता येणे अशक्य आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वांत मोठा फटका उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात बसला आहे. 

मोदींच्या लोकप्रियतेवर अवलंबून राहिला भाजपपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तसेच त्यांची लोकप्रियता यावर भाजप वाजवीपेक्षा अधिक अवलंबून राहिला, हे त्या पक्षाच्या पीछेहाटीचे मुख्य कारण असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. स्थानिक लोकांची नाराजी पत्करून तेथील लोकसभा मतदारसंघांमध्ये अन्य ठिकाणच्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली. त्याचाही फटका भाजपला बसला. काही मतदारसंघात याआधी दोनदा विजयी ठरलेल्या भाजप उमेदवारांनाही हार पत्करावी लागली आहे. मोदी यांच्यावर सर्वस्वी अवलंबून राहाणे, कार्यकर्त्यांनी फार सक्रिय न होणे, याचा तडाखाही भाजपला बसला.

निवडणुकीपासून दूर राहिले संघाचे स्वयंसेवकभाजपच्या प्रचारकार्यासाठी या लोकसभा निवडणुकीत रा. स्व. संघाचे कार्यकर्ते मैदानात उतरले नाहीत. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा नुकतेच म्हणाले होते की, आता भाजपला रा. स्व. संघाची आवश्यकता नाही. भाजप आता स्वबळावर काम करत आहे. या विधानामुळे संघामध्ये तीव्र नाराजी पसरली. नागपूरपासून दिल्लीपर्यंत निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहाण्याच्या सूचना संघाच्या स्वयंसेवकांना देण्यात आल्या होत्या. स्थानिक स्तरावर उमेदवारांबद्दल नाराजी, महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे बनले. त्यामुळे भाजपची पीछेहाट झाली. मोदी यांची गॅरंटी, गरीब कल्याण योजना, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने भाजपला याचा लाभ मिळू शकला नाही.

अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही प्रभावी ठरला नाही‘अब की बार, ४०० पार’ असा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते गाफील राहिले. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जणूकाही त्याचवेळी लोकसभा निवडणुका आहेत, असे कोणालाही वाटावे, अशा पद्धतीने गाजावाजा करण्यात आला. राम मंदिराच्या मुद्यावर अवलंबून राहाणे हेदेखील भाजपला महागात पडले. उत्तर प्रदेशातही या मंदिराचा मुद्दा प्रभावी ठरला नाही. खुद्द अयोध्येत भाजपला पराभव पत्करावा लागला.

 

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल