शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : भारत जाेडाे यात्रेतील पाऊल पडले यशाकडे... भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 06:57 IST

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल आला आहे ती काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दहा वर्षांतील केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विरोधी आघाडी इंडियाने भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले आहे. 

- आदेश रावलनवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच संविधानाची प्रत प्रत्येक भाषणादरम्यान हातात ठेवली आणि त्यांनी नरेंद्र मोदी संविधान बदलण्यासाठी ४०० जागा मागत असल्याचा दावा केला होता. त्याचा परिणाम निकालावर झाला आहे. जनतेने, विशेषतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान आणि कर्नाटकातील मागासवर्गीय समाजातील लोकांनी राहुल गांधींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

संविधानाच्या मुद्द्यावर ठाम राहिलेमोदी सरकार आणि गौतम अदानी यांना सतत प्रश्न विचारणे, एका मानहानीच्या प्रकरणात खासदारकी जाणे, सरकारी बंगला काढून घेणे, शेवटी वायनाडमध्ये निवडणूक लढवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून यांच्या सांगण्यावरून रायबरेलीतून निवडणूक लढविली. युट्युब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून ते तरुणांपर्यंत पोहोचले. असे असले तरीही ते जातनिहाय जनगणना आणि संविधानाच्या मुद्द्याला ते धरून राहिले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसच्या जागा वाढल्यामध्ये दिसून येते. १० मार्च रोजी राहुल गांधी यांनी भाजप खासदार अनंत हेगडे यांच्या संविधान बदलण्याच्या वक्तव्यावर टीका करत संविधान बदलण्यासाठी त्यांना ४०० जागांची गरज आहे, असे उत्तर दिले होते. त्या दिवसापासून ते निवडणूक प्रचार संपेपर्यंत ते या मुद्द्यावर कायम राहिले. धर्माला जात पुरून उरू शकते, हे त्यांना २०१९ च्या पराभवानंतर लक्षात आले होते. त्यामुळे संविधानाच्या मुद्द्यावर ठाम राहिले.

२०१९ च्या पराभवानंतर राहुल गांधी शिकले की...२०१९ मध्ये झालेल्या पराभवानंतर लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, असे राहुल गांधी यांना जाणवले होते. त्यानंतर २०२२ सप्टेंबरमध्ये राहुल गांधी यांनी भाजपने केलेली पप्पू नावाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी यात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी दररोज २५ किलोमीटर पायी चालत होते. पाच महिन्यात राहुल गांधी ३७०० किलोमीटर पायी चालले. या यात्रेत त्यांनी आपल्या घरात, नंतर पक्षात आणि शेवटी जनतेमध्ये आपली प्रतिमा एक भक्कम आणि गंभीर नेता अशी तयार केली.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी