शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

मोदींचं यश शानदार! जगातलं सर्वात विराट जनादेशाचं सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 20:00 IST

मोदी सर्वात तगडा जनादेश पाठिशी असलेले एकमेव नेते

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात विराट जनादेश असलेले राष्ट्र प्रमुख ठरले आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली एकट्या भाजपानं बहुमताचा टप्पा अगदी सहज ओलांडला. पाच वर्ष सत्तेत असूनही भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली. भाजपा त्रिशतक गाठत असताना एनडीएनं साडे तीनशेच्या टप्पा ओलांडला. त्यामुळे आता जगाचा विचार केल्यास, मोदी हे सर्वात तगडा जनादेश पाठिशी असलेले राष्ट्र प्रमुख आहेत.लोकशाहीच्या माध्यमातून इतका दणदणीत विजय मिळवणारे मोदी हे जगातील सध्याचे एकमेव नेते आहेत. या विजयाबद्दल काल इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींचं अभिनंदन केलं. ते नुकतेच पाचव्यांदा निवडून आले. पण त्यांना ही निवडणूक अवघड गेली. ते आता काही छोट्या पक्षांच्या सोबतीनं सरकार चालवत आहेत. तर जपानमध्ये शिंझो अबे बहुमतातील सरकार चालवत असले, तरीही त्यांच्याकडे असणारं बहुमत अतिशय मर्यादित आहे. ऑस्ट्रेलियात स्कॉट मॉरिसन यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. पण त्यांच्यामागे मोदींइतकं बहुमत नाही. युरोपातील अनेक देशांच्या प्रमुखांची स्थितीही फारशी चांगली नाही. ब्रिटनच्या थेरेसा मे यांचं सरकार ब्रेक्झिटमुळे फारसं स्थिर नाही. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युल मॅक्रन आणि जर्मनीच्या अँजेला मर्केल यांच्या सरकारला असणारा जनमताचा पाठिंबा मर्यादित आहे. तुर्कस्थानात इर्दोगन आणि रशियात पुतीन अतिशय मजबूत स्थितीत असल्याचं वाटतं. मात्र प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे निसटतं बहुमत आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाrussiaरशियाBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलJapanजपानShinzo Abeशिन्जो आबेTheresa Mayथेरेसा मेFranceफ्रान्स