शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 19:59 IST

Lok Sabha Election Prediction: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीदेखील BJP ला स्पष्ट बहूमत मिळण्याची भविष्यवाणी केली आहे.

Lok Sabha Election Prediction : लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून, दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडी आपापले सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहेत. अशातच, अमेरिकेतील एका प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञाने लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठा दावा केला आहे.

अलीकडेच देशातील सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला बहूमत मिळण्याची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आता रिस्क अँड रिसर्च कन्सल्टन्सी कंपनी युरेशिया ग्रुपचे संस्थापक आणि अमेरिकन निवडणूक तज्ञ आयन ब्रेमर यांनीदेखील भाजपला 2019 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. हिंदी वृत्तवाहिनी एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 305 (+/-10) जागा मिळतील. म्हणजेच भाजपला जास्तीत जास्त 315 आणि कमीत कमी 295 जागा मिळू शकतात.

ते पुढे म्हणाले की, जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास फक्त भारताच्या सार्वत्रिक निवडणुका पूर्णपणे स्थिर दिसून येतात. इतर सर्व ठिकाणी, विशेषतः अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकाही समस्यांनी भरलेल्या दिसत आहेत. आम्ही व्यापक स्तरावरील भू-राजकीय अनिश्चिततेचा सामना करत आहोत. जागतिक बाजारपेठेवर राजकारणाचा मोठा प्रभाव दिसून येतोय. राजकीयदृष्ट्या स्थिर वाटणारी एकमेव गोष्ट म्हणजे भारतातील निवडणुका. 

प्रशांत किशोर यांचा अंदाजदरम्यान, भारतीय निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरजचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप चमकदार कामगिरी करेल. गेल्या 2019 च्या निवडणुकांपेक्षा तेवढ्याच किंवा जास्त जागा भाजपला मिळतील. विशेषतः भाजप दक्षिण भारतात जोरदार मुसंडी मारेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसPrashant Kishoreप्रशांत किशोर