शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 17:09 IST

Lok Sabha Election : 'टीएमसी-डावे-काँग्रेस सगळे एकसारखेच आहेत.'

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या बिष्णुपूरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवला. 'बंगालमध्ये सुपडा साफ होणार असल्यामुळे तृणमूल घाबरली आहे. त्यामुळेच आता त्यांनी मानवतेची सेवा करणाऱ्या सनातन समाजाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या दबावाखाली आणि त्यांची मते मिळविण्यासाठी संतांना आणि प्रतिष्ठित संस्थांना जाहीरपणे शिव्या देत आहेत, अशी टीका मोदींनी केली. 

TMCला फक्त व्होटबँकेची चिंता ते पुढे म्हणतात, टीएमसी बंगालच्या परंपरेचाही अपमान करत आहे. हे लोक मोदींच्या विरोधात व्होट जिहादचे आवाहन करतात. हे लोक राममंदिराबाबत वारंवार वादग्रस्त आणि फालतू विधाने करतात. टीएमसीला फक्त त्यांच्या व्होट बँकेची काळजी आहे. बंगाल सरकारचा हेतू वाईट आहे. राज्यातील गरीब व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून दिल्लीतून मोफत तांदूळ पाठवले जातात, पण टीएमसीने रेशनमध्येही घोटाळा करते. सरकारने पक्के घर बांधण्याची योजना आणली, पण सरकार लागू करत नाही. 

टीएमसी-डावे-काँग्रेस एकच आहेटीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांचे मॉडेल विकासाचे नाही. टीएमसीचे वाळू माफिया बिनबोभाट आपला धंदा चालवत आहेत. टीएमसी असो, डावे असो की काँग्रेस असो, हे सर्व पक्ष वेगवेगळे दिसत असले तरी, सर्वांचे पाप सारखेच आहे. या लोकांनी मिळून इंडी अलायन्सची स्थापना केली. एकेकाळी इतर राज्यातील लोक रोजगारासाठी बंगालमध्ये येत असत, परंतु आता लोकांना कामासाठी येथून स्थलांतर करावे लागत आहे. राज्यात मोठ्या संख्येने निर्वासित राहतात. CAA अंतर्गत 300 कुटुंबांना नागरिकत्व मिळून दिले. बंगालमधील निर्वासितांनाही लवकरच नागरिकत्व मिळेल, त्यामुळे मोदींच्या हमींवर लोकांचा विश्वास वाढत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका निवडणूक रॅलीत भारत सेवाश्रम संघासारख्या प्रतिष्ठित धार्मिक संस्थेवर गंभीर आरोप केले. संघटनेतील साधू-संत भाजपला निवडणुकीत मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ममतांनी भारत सेवाश्रमचे संन्यासी प्रदिप्तानंद महाराज उर्फ ​​कार्तिक महाराज यांचे थेट नाव घेत ते TMCच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचाही आरोप केला आहे. यावेली त्यांनी रामकृष्ण मिशन संस्थेवरही टीका केली. मिशनचे सदस्य दिल्लीच्या आदेशावर भाजपसाठी मते मागत असल्याचे ममतांनी म्हटले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी